स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी प्रसिद्ध असेलली सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक अप्रतिम ऑफर आणली आहे. होय, तुम्हाला या प्लॅनची किंमत आणि बेनिफिट्स ऐकून धक्काच बसेल. कंपनी या प्लॅनमध्ये 797 रुपयांच्या स्वस्त किमतीत 300 दिवसांसाठी बेनिफिट्स देत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना BSNL बेस्ट प्रीपेड प्लॅनच्या ऑफर मिळत आहेत. बघुयात सविस्तर-
Survey
✅ Thank you for completing the survey!
BSNL चा 797 रुपयांचा प्लॅन
BSNL
BSNL च्या या प्लॅनमध्ये एकूण 300 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. मात्र, याआधी या प्लॅनची वैधता 365 दिवसांची होती. मात्र, प्लॅनमधील ही वैधता आता वाढवण्यात आली आहे. वैधतेव्यतिरिक्त, प्लॅनमधील सर्व फायदे पूर्वीप्रमाणेच आहेत. म्हणजेच प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत.
लक्षात घ्या की, हे सर्व मोफत लाभ फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी आहेत. तुमचे सिम उर्वरित 240 दिवस सक्रिय राहणार आहे. सेकंडरी सिमसाठी हा प्लॅन उत्तम ठरेल. 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर लोकल आणि STD कॉल 2/मिनिट दराने, SMS 80/P दराने आणि डेटा 25p/MB दराने उपलब्ध होतील.
BSNL चा 1,198 रुपयांचा प्लॅन
BSNL
वरील प्लॅनच्या वैधतेप्रमाणे कंपनीकडे आणखी एक प्लॅन आहे, ज्याची किंमत 1,198 रुपये आहे. BSNL च्या 1198 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना उत्तम ऑफर्स मिळतात. खरं तर, या प्लॅनला अष्टपैलू प्लॅनही म्हणता येईल. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये मासिक खर्च सुमारे 100 रुपये आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले फायदे महिन्यानुसार विभागले गेले आहेत. प्लॅनमध्ये कंपनी दरमहा 300 मिनिट कॉलिंगसाठी, दरमहा 3GB हायस्पीड डेटा आणि दरमहा 30SMS ऑफर करत आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile