150 दिवसांच्या वैधतेसह BSNL चा अप्रतिम प्लॅन, किंमतही कमी

HIGHLIGHTS

BSNL चा 397 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हला 5 महिन्यांची वैधता मिळेल.

तसेच, दररोज 2GB डेटा सुविधा मिळणार आहे.

150 दिवसांच्या वैधतेसह BSNL चा अप्रतिम प्लॅन, किंमतही कमी

सर्वोत्तम बेनिफिट्ससह सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड BSNL कंपनी प्रसिद्ध आहे. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या एका उत्तम प्लॅनबद्दल सांगणार आहोत. हा प्लॅन जबरदस्त बेनिफिट्ससह कमी किमतीत येणार प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. हा प्लॅन दीर्घकाळ वैधतेसह येतो. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

BSNL चा 397 रुपयांचा प्लॅन 

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा BSNL चा 397 रुपयांचा प्लॅन आहे. हा प्लॅन 150 म्हणेजच पूर्ण 5 महिन्यांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्समध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा मिळेल. तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 60GB डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 40kbps पर्यंत कमी होईल. 

याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबरच, तुम्हाला दररोज 100 SMS मिळणार आहेत. नेट संपल्यानंतरही तुम्ही तुमच्या खास व्यक्तीसह नॉर्मल टेक्स्टद्वारे संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, इतर टेलिकॉम कंपन्या याच किंमत श्रेणीमध्ये संपूर्ण एक महिन्याची देखील सुविधा देत नाही.  

मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स तुम्हाला केवळ 30 दिवसांपर्यंत मिळणार आहेत. पण तुमचा नंबर पूर्ण 150 दिवसांपर्यंत सक्रिय राहण्यास मदत होईल. तुम्हाला सेकंडरी सिम दीर्घकाळ वैधतेसह सक्रिय ठेवायची असेल तर, हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo