HIGHLIGHTS
BSNL चा 365 दिवसांचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन
रिचार्ज प्लॅनची किंमत एकूण 1,999 रुपये
या प्लॅनमध्ये एकूण 600 GB डेटा उपलब्ध
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL कडे असे अनेक प्रीपेड प्लॅन आहेत, जे ग्राहकांना दीर्घकाळ वैधता देतात. आज आम्ही तुम्हाला BSNLच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो 365 दिवसांच्या वैधतेसह कॉलिंग आणि भरपूर डेटा यांसारखे फिचर्स देतो. या रिचार्ज प्लॅनची किंमत 1,999 रुपये आहे. चला तर जाणून घेऊयात या रिचार्ज प्लॅनबद्दल सविस्तर माहिती…
Surveyहे सुद्धा वाचा : Airtelचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, फक्त 10 रुपयांमध्ये मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या तपशील
BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. ही योजना अनेक सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये, तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 SMS आणि 600 GB डेटा दिला जातो. हा डेटा वैधतेदरम्यान कधीही वापरला जाऊ शकतो. यानुसार, तुम्हाला दररोज 1.8 GB डेटा मिळतो.
Jioचा 2,545 रुपयांचा प्लॅन आहे, ज्याची एकूण वैधता 336 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 504 GB होतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले आहे.
Airtel आणि Vi चा 1,799 रुपयांचा प्लॅन आहे, जो 365 दिवस चालतो. हा एक अतिशय स्वस्त 1 वर्षाचा प्लॅन आहे, ज्यामध्ये एकूण 24 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज उपलब्ध आहेत. एकूणच BSNL च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2,000 रुपयांपेक्षा कमी खर्चात सर्वाधिक सुविधा मिळत आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile