BSNL युजर्सची मज्जाच मजा! फक्त 118 रुपयांमध्ये मिळतोय तब्बल 10GB डेटा, Unlimited कॉलिंगसह मनोरंजनाची देखील सोय। Tech News
BSNL ने लाँच केला नवा 118 रुपयांचा प्लॅन
कंपनीने अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर पोस्ट शेअर करून माहिती दिली.
BSNL च्या या प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे.
देशातील एकमेव सरकारी टेलिकम कंपनी BSNL नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन्स आणि ऑफर्स सादर करत असते. जर तुम्हीही असा प्लान शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत अनेक फायदे मिळतील. तर, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला BSNL च्या एका आकर्षक प्लॅनबदल माहिती देणार आहोत. या प्लॅनची किंमत केवळ 118 रुपये आहे.
Surveyया प्लॅनमध्ये फक्त डेटाच नाही तर अनलिमिटेड कॉलिंग आणि युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात बेनिफिट्स-
BSNL चा 118 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या 118 रुपयांचा प्लॅनबद्दल कंपनीने अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनसह तुम्हाला 10GB डेटासह अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळणार आहे.
Revitalize your entertainment experience with #BSNL's recharge voucher ₹118/- and dive into a world of over 100,000 songs in multiple languages on #Wow!#RechargeNow: https://t.co/v5sIVmXXhA (For NZ,WZ & EZ), https://t.co/IF5LZBP6Bd (For SZ)#WowEntertainment #BSNLRecharge pic.twitter.com/9e8aIQmify
— BSNL India (@BSNLCorporate) May 22, 2024
वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनाची देखील सोय केली गेली आहे. Waah वर 1,00,000 गाण्यांचा ॲक्सेस मिळेल. जे हिंदी, भोजपुरी, पंजाबी यासह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. BSNL चा हा प्लॅन संपूर्ण 20 दिवसांच्या वैधतेसह येतो. वैधता उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आणि रिचार्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत साईटला भेट द्या.
BSNL 4G

BSNL 4G येत्या काही महिन्यातच लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका अहवालात BSNL ची 4G सर्व्हिस या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. सध्या दक्षिण भारतातील काही भागात BSNL ची 4G सेवा उपलब्ध आहे. मात्र, अजूनही काही क्षेत्रांत BSNL 3G नेटवर्क सुरु आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, सरकारी टेलिकॉम कंपनी 4G नेटवर्कवर काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. BSNL त्यांचे 4G नेटवर्क ऑगस्ट 2024 मध्ये सुरू करेल, असा दावा ताज्या अहवालात करण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile