100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे जबरदस्त प्लॅन, मिळतील मोफत डेटा आणि कॉलिंगसारखे आकर्षक फायदे

100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे जबरदस्त प्लॅन, मिळतील मोफत डेटा आणि कॉलिंगसारखे आकर्षक फायदे
HIGHLIGHTS

Airtel आणि Vi 99 रुपयांचे स्वस्त प्लॅन्स ऑफर करतात

मात्र, यापेक्षा JIO 91 रुपयांच्या रिचार्जमध्ये अधिक फायदे देते.

प्लॅन्समध्ये एकूण 28 दिवसांची वैधता उपलब्ध

गेल्या वर्षी Airtel आणि Vodafone Idea ने त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या आणि त्यानंतर काही दिवसांनी, 1 डिसेंबरपासून, Jio ने देखील त्यांच्या वापरकर्त्यांना धक्का दिला आहे. त्यानंतर ग्राहकांना नाईलाजाने तेच महागडे रिचार्ज करावे लागतात. मात्र, रिचार्ज प्लॅनच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहक स्वस्त  रिचार्ज प्लॅन शोधत असतात. या शोध मोहिमेत आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे प्लॅन्स सांगणार आहोत. 

हे सुद्धा वाचा  : 'जुग जुग जियो'ला मिळाले या वर्षीच्या टॉप 5 चित्रपटांच्या यादीत स्थान, करण जोहरने मानले प्रेक्षकांचे आभार

Airtel आणि Vodafone Idea 99 रुपयांचे स्वस्त प्लॅन्स ऑफर करतात, जे जवळपास सारखेच आहे. मात्र, Jio बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी कमी किंमतीत एअरटेल आणि वोडाफोनच्या तुलनेत 91 रुपयांच्या रिचार्जमध्ये अधिक फायदे देत आहे.

JIO चा 91 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 

 Jioच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 3GB डेटा मिळतो. कंपनी ग्राहकांना दररोज 100MB डेटा आणि एकूण डेटामध्ये 200MB अतिरिक्त डेटा देत आहे. याशिवाय प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, 50SMS मोफत उपलब्ध आहेत. जिओच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे. मात्र, हा रिचार्ज फक्त JioPhone मध्येच काम करेल.

Airtel चा 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 

या रिचार्ज प्लॅनमध्ये 200MB डेटा उपलब्ध आहे. तसेच, या रिचार्जमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1 पैसे प्रति सेकंद शुल्क द्यावे लागेल. प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. मात्र यामध्ये SMS चा लाभ मिळणार नाही.

BSNL चा 87 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

 प्लॅनमध्ये एकूण 14 दिवसांची वैधता ऑफर केली जात आहे. म्हणजेच, तुम्हाला या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले सर्व फायदे केवळ 14 दिवसांसाठी मिळतील. 87 रुपयांच्या BSNL रिचार्ज प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्हाला या प्लॅनसह एकूण 14GB डेटा ऑफर केला जात आहे. मात्र, दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड 40Kbps पर्यंत खाली येणार आहे. BSNL प्लॅनसह, तुम्हाला दररोज 100 SMS देखील मिळतात. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील मिळत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo