तुम्ही घरूनच ऑफिसचे काम करत आहात ? पण अजूनही घरी ब्रॉडबँड कनेक्शन लावले नाही. एक प्रकारे बरंच झालं, कारण Airtel तुम्हाला ब्रॉडबँड कनेक्शनसह काही खास ऑफर देखील देणार आहे. तसेच, तुम्हाला बिलावर तब्बल 15% ची सूट देखील जाहीर करण्यात आली आहे. कसे ? ते बघुयात
Survey
✅ Thank you for completing the survey!
'अशा'प्रकारे मिळेल सूट
तुमच्या बिलावर 15% सवलतीचा लाभ घेण्यासाठी इथे एक अट आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या ऑफरचा लाभ केवळ 6 महिने किंवा 12 महिन्यांसाठी रिचार्ज केल्यावरंच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांच्या प्लॅनवर 7.5% सूट दिली जाणार आहे. तर 12 महिन्यांच्या प्लॅनवर 15% सूट दिली जाणार आहे. लक्षात घ्या की, ही ऑफर 499 रुपये किंवा त्यावरील सर्व प्लॅनसह मिळेल.
विशेष म्हणजे Airtel चे 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांचे प्लॅन घेणाऱ्या युजर्सकडून ब्रॉडबँड कनेक्शनसाठी 1500 रुपयांचा स्टॅंडर्ड इन्स्टॉलेशन शुल्क आकारला जाणार नाही. पण जर तुम्ही एका महिन्याच्या प्लॅनसह रिचार्ज केले तर तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी पूर्ण 1500 रुपये द्यावे लागणार आहेत.
Jio चा स्वस्त प्लॅन
रिलायन्स Jio कडे Jio Fiber 198 रुपयांच्या प्लॅन आहे. यात ग्राहकांना 10Mbps स्पीडसह अमर्यादित इंटरनेट मिळेल. याशिवाय जिओ फायबरच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड लँडलाईन कॉलिंग देखील मिळते. Jio Fiber च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 198 रुपयांच्या आत हाय स्पीड इंटरनेट आणि OTT चे लाभ मिळतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile