Airtel New OTT Plan: भारती Airtel कंपनी आपल्या महागड्या पण फास्टेस्ट इंटरनेट देणाऱ्या प्लॅनसाठी ओळखली जाते. दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. लक्षात घ्या की, हा प्लॅन 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. तुम्हाला समजलेच असेल की, या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ इंटरनेट आणि कॉलिंगच नाही तर OTT बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. होय, या प्लॅनमध्ये विशेषतः युजरच्या मनोरंजनाची सोय करण्यात आली आहे. पाहुयात किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
वर सांगितल्याप्रमाणे, टेलिकॉम दिग्गज Airtel कंपनीने आपल्या यूजर्ससाठी नवा प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने या प्लॅनची किंमत 398 रुपये इतकी ठेवली आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, Airtel कंपनीच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे. म्हणजेच हा प्लॅन जवळपास एक महिन्याच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा एक्सेस मिळतो. याशिवाय फोनमध्ये 5G अनलिमिटेड डेटाची सुविधा देखील आहे.
याव्यतिरिक्त, Airtel च्या 398 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. संपूर्ण वैधतेदरम्यान 28 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेता येईल. तुम्हाला कोणताही अडथडा आणि टाइम लिमिटशिवाय कॉलिंग करण्यास उत्तम सुविधा मिळत आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये दररोज 100SMS पाठवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.
आता विशेष मुद्द्याकडे येत, वर सांगितल्याप्रमाणे, यूजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय केली गेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी या प्लॅनमध्ये मोफत Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनचे OTT बेनिफिट्स आहे. यासह तुम्ही स्टारच्या सर्व चॅनेल्सवरील टीव्ही शोज, हिट चित्रपट, प्रसिद्ध वेब सिरीज आणि परदेशी कंटेंटदेखील सहज पाहू शकता. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही Airtel Thanks ॲप आणि Airtel वेबसाइटद्वारे हा प्लॅन ऍक्टिव्ह करू शकता. किंवा रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile