Airtel New Plans: टेलिकॉम दिग्गजने IPLसाठी लाँच केले नवीन डेटा प्लॅन्स, किंमत 39 रुपयांपासून सुरु। Tech News 

HIGHLIGHTS

Airtel कंपनीने आपल्या युजर्ससाठी 3 नवीन डेटा पॅक लाँच केले आहेत.

Airtel चे नवीन प्लेस विशेषतः IPL 2024 ला समर्पित आहेत.

Airtel च्या नवीन डेटा प्लॅन्समध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा मिळेल.

Airtel New Plans: टेलिकॉम दिग्गजने IPLसाठी लाँच केले नवीन डेटा प्लॅन्स, किंमत 39 रुपयांपासून सुरु। Tech News 

Airtel कंपनीने आपल्या क्रिकेट लव्हर्स युजर्ससाठी 3 नवीन डेटा पॅक लाँच केले आहेत. तुम्हाला समजलेच असेल की, हे नवीन प्लेस विशेषतः IPL 2024 ला समर्पित आहेत. सध्या IPL 2024 ची भारतात धमाकेदार सुरुवात झाली आहे. IPL चे सामने ऑनलाईन पाहण्यासाठी वापरकर्त्यांना भरपूर डेटाची आवश्यकता आहे. या डेटा पॅकद्वारे, वापरकर्त्यांना कमी खर्चात भरपूर डेटा ऍक्सेस मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel चे नवीन प्लॅन्स केवळ 39 रुपयांपासून सुरु होतात.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Airtel चा 39 रुपयांचा प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे, Airtel चा 39 रुपयांच्या डेटा प्लॅन या यादीतील स्वस्त प्लॅन आहे. या डेटा पॅकमध्ये 1 दिवसाची वैधता मिळते. या 1 दिवसाच्या वैधतेसह कंपनी अमर्यादित डेटा ऑफर करत आहे, ज्याचा FUP 20GB आहे. लक्षात घ्या की, 20GB डेटा ऍक्सेस केल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. कारण तुम्ही 1 दिवसात केवळ 20GB डेटा ऍक्सेस करू शकता.

airtel IPL 2024 Bonanza sale full details
airtel IPL 2024

Airtel चा 49 रुपयांचा प्लॅन

49 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना वरील प्लॅनप्रमाणे अमर्यादित डेटा मिळेल. या प्लॅनसह देखील एका दिवसाची वैधता मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्ही फक्त 1 दिवसासाठी 20GB डेटा वापरू शकता. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी Wynk प्रीमियम सदस्यता मिळेल.

Airtel चा 79 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 79 रुपयांच्या प्लॅन संपूर्ण 2 दिवसांच्या वैधतेसह येतो. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 20GB डेटाचा ऍक्सेस मिळेल. हा डेटा तुम्हाला 2 दिवस वापरता येईल. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना 40GB डेटा मिळणार आहे. तर दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होईल.

IPL 2024 सुरु झाल्यानंतर लगेच भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायंस Jio ने देखील क्रिकेटप्रेमींसाठी विशेष प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्ससह Jio युजर्स विना अडथडा IPL सामन्यांचा लाभ घेऊ शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo