HIGHLIGHTS
Airtel चे नवे ब्रॉडबँड स्टँडबाय प्लॅन्स
या दोन नव्या प्लॅन्सची किंमत 199 आणि 399 रुपये
कंपनीचा 499 रुपयांचा प्लॅन 40Mbps च्या स्पीडसह येतो.
Airtel आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी दररोज नवनवीन प्लॅन्स आणत असते. यामध्ये, Airtel ने ब्रॉडबँड सेवा Airtel Xstream Fiber वापरकर्त्यांसाठी दोन स्वस्त प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 199 रुपयांपासून सुरू होणार असून हे प्लॅन्स 'ब्रॉडबँड स्टँडबाय प्लॅन्स' म्हणून ओळखले जातात. या प्लॅन्समध्ये तुम्हाला काय खास मिळेल ते सविस्तर बघुयात-
SurveyAirtel च्या 199 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 10Mbps स्पीडसह अमर्यादित डेटाचा लाभ मिळणार आहे. हा एंट्री लेव्हल प्लॅन 5 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच GST सह 1,174 रुपयांमध्ये मिळणार आहे. यासोबतच, GST सह 500 रुपये इन्स्टॉलेशन चार्ज देखील घेतला जाणार आहे. या प्लॅनसह युजर्सना कंपनी मोफत राउटर देणार, असे सांगितले जात आहे.
वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्येही तुम्हाला 10Mbps च्या स्पीडसह डेटा मिळणार आहे. या प्लॅनसह तुम्हाला अमर्यादित डेटा, Xtreme बॉक्स, मोफत Wi-Fi राउटर आणि 350 हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा लाभ घेता येईल.मात्र, एक लक्षात घ्या की, हा प्लॅनदेखील तुम्हाला किमान 5 महिन्यांसाठी घ्यावा लागेल. तसेच, GSTसह वन टाइम इन्स्टॉलेशन चार्ज देखील द्यावा लागेल.
AIRTEL कडे आणखी अनेक ब्रॉडबँड प्लॅन्स आहेत. कंपनीचा 499 रुपयांचा प्लॅन 40Mbps च्या स्पीडसह येतो. हा कंपनीचा बेसिक प्लॅन आहे, ज्यामध्ये GST लागू होत नाही. तसेच, यात अमर्यादित कॉलिंग आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्सदेखील मिळणार आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile