AIRTEL चा 29 रुपयांचा नवा प्लॅन लाँच, भरपूर इंटरनेट चालवा

HIGHLIGHTS

AIRTEL चा 29 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 1 दिवसाची वैधता मिळणार आहे.

सर्वात स्वस्त डेटा प्लॅनची ​​किंमत 19 रुपये

AIRTEL चा 29 रुपयांचा नवा प्लॅन लाँच, भरपूर इंटरनेट चालवा

AIRTEL ने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये एक नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन समाविष्ट केला आहे. खरं तर, हा कंपनीचा नवीन डेटा पॅक आहे. जो कंपनीने फक्त 30 रुपयांअंतर्गत सादर केला आहे. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे, ज्यांना जास्त डेटा व्हॉल्यूमची गरज नाही. अशा परिस्थितीत, कमी खर्च करून अतिरिक्त डेटा मिळणार आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

AIRTEL चा 29 रुपयांचा प्लॅन 

AIRTEL च्या या नव्या प्लॅनची किंमत फक्त 29 रुपये आहे. त्याबरोबरच, हा नवीन डेटा प्लॅन वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 1 दिवसाची वैधता मिळणार आहे. एका दिवसाच्या वैधते दरम्यान डेटा प्लॅन वापरकर्त्यांना 2GB हाय-स्पीड डेटा देईल. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना 29 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये इतर कोणतीही सुविधा मिळणार नाही. या पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा किंवा दररोज SMS चा समावेश नाही.

 हा प्लॅन केवळ वापरकर्त्यांच्या अतिरिक्त डेटाची गरज पूर्ण करण्यासाठी सादर करण्यात आला आहे. जर तुम्ही दररोज 1GB किंवा 2GB डेटा असलेला प्लॅन युज करत असाल, त्यानंतर डेटा कोटा एखाद्या दिवशी संपतो. तेव्हा तुम्ही हा 29 रुपयांचा टॉप-अप प्लॅन ऍक्टिव्ह करू शकता. 

AIRTEL चा 19 रुपयांचा प्लॅन 

AIRTEL च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक डेटा प्लॅन समाविष्ट आहेत. यातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅनची ​​किंमत 19 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 दिवसाच्या वैधतेसह 1GB डेटा मिळतो. यासह तुम्ही एका दिवसाच्या डेटाची गरज सहज भागवू शकता. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo