Airtel च्या ‘या’ स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे ग्राहक खुश, मिळेल मोफत OTT सब्स्क्रिप्शन

Airtel च्या ‘या’ स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे ग्राहक खुश, मिळेल मोफत OTT सब्स्क्रिप्शन
HIGHLIGHTS

Airtel चे चार स्वस्त रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला 56 दिवसांची वैधता मिळेल.

याशिवाय या प्लॅन्समध्ये मोफत OTT सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.

आज आम्ही तुम्हाला Airtel च्या अशा 4 स्वस्त प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये अमर्यादित डेटा आणि कॉलिंग व्यतिरिक्त दररोज 100 SMS सुविधा मोफत दिली जाते. याशिवाय या प्लॅन्समध्ये मोफत OTT सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. बघुयात या प्लॅन्सची यादी… 

हे सुद्धा वाचा : iPhone 14 Pro ने शूट झाला ईशान खट्टरचा चित्रपट 'Fursat', येथे बघा अगदी मोफत…

Airtelचा 155 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 24 दिवस आहे. या प्लॅनमध्ये 1GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 300 SMS सुविधा मोफत दिली जाते. या रिचार्ज प्लॅनमध्ये WYNK म्युझिक सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. यासोबत, Amazon प्राइम मोबाइल एडिशन सबस्क्रिप्शन 30 दिवसांसाठी मोफत दिले जात आहे.

Airtelचा 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनवर 21 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर रोज 1GB डेटाचा आनंद घेऊ शकतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत.

Airtelचा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

 या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यामध्ये यूजर रोज 1.5GB डेटा वापरू शकतो. तसेच, यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग दिले जात आहे. हा रिचार्ज प्लॅन Airtel Xstream Premium, WYNK म्युझिक सबस्क्रिप्शनसह येतो. या सर्व सुविधांसोबतच त्यावर मोफत हॅलो ट्यूनची सुविधाही देण्यात येत आहे.

Airtelचा 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Airtelचा 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 1.5GB डेटा मोफत उपलब्ध आहे. तसेच, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यासह, वापरकर्ता दररोज 100 SMS चा लाभ घेऊ शकतो. या प्लॅनमध्ये फ्री हॅलो ट्यून ऑफर करण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo