Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, एकदा रिचार्ज करून मिळेल वर्षभरासाठी सर्व बेनिफिट्स अमर्यादित

Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, एकदा रिचार्ज करून मिळेल वर्षभरासाठी सर्व बेनिफिट्स अमर्यादित
HIGHLIGHTS

Airtelचा 1799 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन संपूर्ण एका वर्षाच्या वैधतेसह येतो.

या प्लॅनसह तुम्हाला अनेक जबरदस्त बेनिफिट्स मिळतील.

Airtel वापरकर्त्यांना अनेक प्रकारचे वार्षिक प्लॅन ऑफर करते. पण 1,799 चा वार्षिक Airtel प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, जर तुम्हाला वर्षभर वारंवार रिचार्ज करण्याच्या ताणातून मुक्त व्हायचे असेल, तर तुम्ही Airtel च्या या प्लॅनबद्दल विचार करू शकता.

हे सुद्धा वाचा : ONEPLUS NORD 2T 5Gवर रु. 3000रुपयांची सूट, बघा कुठे मिळतेय खास ऑफर ?

Airtelचा 1799 रुपयांचा प्लॅन 

Airtelचा हा वार्षिक प्लॅन 1,799 रुपयांचा आहे. या प्लॅन अंतर्गत तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी एकूण 24 GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग सेवा मोफत दिली जाते. हा प्लॅन खास त्या यूजर्ससाठी आहे, जे कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त कमी डेटा वापरतात. तसेच, यामध्ये 3600 SMS ची परवानगी मिळते. 

त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये हेलोट्यून आणि विंक म्युझिक हेलोट्यून्स आणि गाणी ऐकण्यासाठी मोफत सबस्क्रिप्शन देतात. इतकेच नाही तर FasTag वर 100 रुपयांचा कॅशबॅकही दिला जातो. जर तुम्ही वर्ष संपण्यापूर्वी 24 GB डेटा संपवला तर तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. यामध्ये प्रत्येक Mb साठी 50 पैसे आकारले जातील.

इतर कंपन्यांचे वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लॅन  

Airtel प्रमाणे, Vodafone Idea आणि Jio देखील त्यांच्या वापरकर्त्यांना वार्षिक प्लॅन्स ऑफर करतात. Vi चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन 1,799 रुपयांचा आहे, याशिवाय, Jio चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन 1,559 रुपयांचा आहे. Vi च्या 1,799 रुपयांच्या प्लॅनमध्ये Airtel प्रमाणे एकूण 24GB डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सुविधा देखील देण्यात आली आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये 365 दिवसांची मर्यादा दिली जात आहे. Jio च्या 1,559 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग दिले जाते. तसेच अनेक ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo