Airtelचा नवा प्लॅन ! संपूर्ण कुटुंबासाठी कॉलिंग, डेटासह Prime Video आणि Hotstar सब्स्क्रिप्शन उपलब्ध

Airtelचा नवा प्लॅन ! संपूर्ण कुटुंबासाठी कॉलिंग, डेटासह Prime Video आणि Hotstar सब्स्क्रिप्शन उपलब्ध
HIGHLIGHTS

Airtelने नवीन ब्लॅक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.

हा रिचार्ज प्लॅन 998 रुपयांचा आहे.

Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि Airtel Xstream ऍपची सेवा उपलब्ध

दूरसंचार कंपनी भारती Airtelने नवीन पोस्टपेड रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. नुकत्याच लाँच झालेल्या ब्लॅक सीरीजचा हा नवीन रिचार्ज प्लॅन आहे. यापूर्वी Airtel ने प्लॅटिनम 599 रुपयांना आणि Airtel ब्लॅक 799 रुपयांना लाँच केले होते. यानंतर Airtel ने नवीन ब्लॅक 998 रुपयांचा पोस्टपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे. Airtel चा ब्लॅक रु. 998 Xtreme फायबर ब्रॉडबँड कनेक्शन दोन पोस्टपेड कनेक्शनसह येतो.

Airtel ब्लॅक 998 रुपयांचा प्लॅन 

Airtel ब्लॅक 998 प्लॅन 105GB डेटा सोबत 200GB डेटा रोलओव्हर सुविधेची ऑफर देतो. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 SMS सुविधा उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, एअरटेल पोस्टपेड प्लॅनमध्ये विंक म्युझिक, हेली ट्यून्स, एक्स्ट्रीम मोबाइल पॅक दिले जात आहेत.

हा प्लॅन कस्टमाइजही करता येतो. तसेच, दोन पोस्टपेड एअरटेल कनेक्शन दिले जात आहेत. यामध्ये एक नियमित आणि एक फ्री ऍड ऑन कनेक्शन समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम फायबर सेवा दिली जात आहे. तसेच लँडलाईन सेवाही दिली जात आहे. याचा अर्थ तुम्ही कोणत्याही मोबाईलवर मोफत अमर्यादित कॉलिंग करू शकता. या प्लॅनमध्ये 40 Mbps हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्शन देण्यात आले आहे.

युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय 

 या व्यतिरिक्त, Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि Airtel Xstream ऍपची सेवा या प्लॅनमध्ये दिली जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये मोफत इन्स्टॉलेशनची सुविधा देण्यात आली आहे. तुम्ही 5G सक्षम सेवा क्षेत्रात राहत असल्यास, तुम्ही मोफत 5G इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ शकता. मात्र, 5G सेवेसाठी तुम्ही 5G क्षेत्रात असणे आवश्यक आहे. तसेच, तुमच्या मोबाईलचे किमान रिचार्ज 249 रुपये किंवा त्याहून अधिक असावे.

 

 

 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo