AIRTEL : हा प्लॅन 84 दिवसांची वैधता आणि 2.5GB डेटासह येतो, मिळतील अनेक बेनिफिट्स

AIRTEL : हा प्लॅन 84 दिवसांची वैधता आणि 2.5GB डेटासह येतो, मिळतील अनेक बेनिफिट्स
HIGHLIGHTS

AIRTEL चा 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन तीन महिन्यांच्या वैधतेसह येतो

अमर्यादित कॉलिंग सुविधेसह मिळेल दररोज 2.5GB डेटा आणि बरेच काही

दूरसंचार कंपनी भारती AIRTEL ने ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. या प्लॅन्समध्ये दररोज 1GB डेटा ते 3GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचे प्लॅनही उपलब्ध आहेत. AIRTEL मधील अनेक प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि अमर्यादित कॉलिंग तसेच अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. जर तुम्ही अधिक डेटासह OTT सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स शोधत असाल, तर Airtel चा 999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

हे सुद्धा वाचा : Wi-Fi पासवर्ड विसरलात? काळजी करू नका, 'अशा'प्रकारे होईल रिकव्हर, बघा सोप्या स्टेप्स

AIRTEL चा 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग सुविधेसह दररोज 2.5GB डेटा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS देखील मिळतात. हाय स्पीड इंटरनेट मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटला 64kbps स्पीड मिळेल. एअरटेलच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, Amazon प्राइम मेंबरशिप देखील यामध्ये उपलब्ध आहे. त्याची वैधता देखील तीन महिन्यांसाठी उपलब्ध आहे. 

याशिवाय, तुम्हाला Airtel Xstream Mobile चे सबस्क्रिप्शन मिळते आणि SonyLiv देखील Airtel ऍपच्या मदतीने पाहता येते. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला विंक म्युझिक ऍपवर मोफत गाणी ऐकण्याची सुविधा आणि मोफत हॅलो ट्यून्सचा लाभही मिळतो. 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला या सर्व फायद्यांसह FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo