दीर्घकाळ वैधतेसह AIRTEL प्लॅन! दररोज 1.5GB डेटा, कॉलिंग आणि Disney + Hotstar, बघा किंमत

दीर्घकाळ वैधतेसह AIRTEL प्लॅन! दररोज 1.5GB डेटा, कॉलिंग आणि Disney + Hotstar, बघा किंमत
HIGHLIGHTS

Airtel चा 666 रुपयांचा प्लॅन

दीर्घकाळ वैधतेसह मिळेल Disney + Hotstarचे मोबाईल सबस्क्रिप्शन

प्लॅनच्या इतर फायनद्यांमध्ये अनेक महत्त्वाचे बेनिफिट्स

Airtelने अलीकडेच 5G हाय-स्पीड नेटवर्क आता भारतातील 265 शहरांमध्ये पोहोचले आहे. 5G लाँच केल्यानंतर एअरटेलने काही प्लॅनमध्ये बदल केले आहेत. परंतु कंपनीचे काही प्लॅन आहेत, जे बऱ्याच काळापासून सुरु आहेत आणि ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो कंपनीच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये अजूनही जबरदस्त फायद्यांसह उपलब्ध आहे. 

हे सुद्धा वाचा : जबरदस्त बेनिफिट्ससह 150 दिवसांची वैधता असलेला BSNLचा स्वस्त प्लॅन, किंमत किती ?

Airtel चा 666 रुपयांचा प्लॅन  

Airtel Truly Unlimited Plans मध्ये समाविष्ट असलेला हा पॅक 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच तुम्हाला यामध्ये सुमारे 3 महिन्यांची वैधता मिळते. तुम्ही एअरटेल थँक्स ऍप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून 666 रुपयांमध्ये प्लॅन ऍक्टिव्ह करू शकता. हा रिचार्ज प्लॅन तुम्हाला दररोज 1.5GB डेटा देतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतरही यामध्ये कनेक्टिव्हिटी कायम आहे, परंतु स्पीड 64Kbps असेल. म्हणजेच प्लॅनच्या वैधतेपर्यंत तुम्हाला 126 GB इंटरनेट डेटा मिळेल.

याशिवाय, प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधाही मिळते. तुम्हाला प्रीपेड पॅकमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतात. यामध्ये युजरला Disney + Hotstarचे मोबाईल सबस्क्रिप्शन पॅकेज 3 महिन्यांसाठी मिळते. त्याबरोबरच, यात तीन महिन्यांसाठी Apollo 24|7 सर्कलचे सब्सक्रिप्शन मिळेल.

यासोबतच, तुम्हाला फ्री हॅलोट्यून्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. दुसरीकडे, हा प्लॅन तुम्हाला विंक म्युझिक फ्री सब्सक्रिप्शन देतो. ज्याद्वारे तुम्ही नवीनतम गाणी ऐकू शकता आणि तुमची हॅलो ट्यून म्हणून सेट करू शकता. या प्लॅनमध्ये FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील समाविष्ट आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo