Airtel 49rs Plan: युजर्सची तर मज्जाच मजा! अगदी कमी किमतीत मिळेल Unlimited डेटा। Tech News 

Airtel 49rs Plan: युजर्सची तर मज्जाच मजा! अगदी कमी किमतीत मिळेल Unlimited डेटा। Tech News 
HIGHLIGHTS

Airtel च्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल करण्यात आले आहेत.

या प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित डेटा लाभ मिळणार आहे.

Airtel कडे 100 रुपयांअंतर्गत प्लॅन आहे, जो अमर्यादित डेटा ऑफर करतो.

Airtel युजर्सची तर मज्जाच मजा सुरु झाली आहे. होय, Airtel प्रीपेड यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. कंपनीने आपल्या 49 रुपयांच्या स्वस्त डेटा पॅकमध्ये मोठा बदल केला आहे. या प्लॅनमुळे Airtel यूजर्सना आता पूर्वीपेक्षा जास्त डेटा दिला जाईल. अधिकाधिक नवीन वापरकर्त्यांना Airtel नेटवर्कशी जोडण्यासाठी कंपनी वेळोवेळी प्लॅन बदलत असते.

हे सुद्धा वाचा: Samsung Phone Price Cut: 50MP कॅमेरासह येणाऱ्या फोनच्या किमतीत कपात, जाणून घ्या नवी किंमत। Tech News

Airtel 49 रुपयांचे बेनिफिट्स

49 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये याआधी कंपनी वापरकर्त्यांना फक्त 6GB हाय-स्पीड डेटा ऑफर करत होती. पण, वर सांगितल्याप्रमाणे या प्लॅनच्या बेनिफिट्समध्ये बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता 49 रुपये खर्च करून तुम्हाला अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळणार आहे. नवीन बेनिफिट्ससह 49 रुपयांचा हा परवडणारा डेटा प्लॅन कंपनीच्या अधिकृत साइटवर सूचीबद्ध करण्यात आला आहे.

Airtel Best Plans in 2024

वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 1 दिवसाची वैधता मिळेल. मात्र लक्षात घ्या की, हा प्लॅन 20GB च्या FUP मर्यादेसह येतो. म्हणजेच डेटा अमर्यादित आहे, पण 20GB डेटा वापरल्यानंतर स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल.

अनलिमिटेड डेटासह येणारे Airtel प्लॅन्स

Airtel कडे अमर्यादित डेटासह अजून एक प्लॅन आहे. 49 रुपयांव्यतिरिक्त Airtel कडे 100 रुपयांपेक्षा कमी डेटा प्लॅन आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित डेटा ऑफर करतो आणि या प्लॅनची ​​किंमत 99 रुपये आहे. Airtel च्या 99 रुपयांच्या प्लॅनसह तुम्हाला एक ऐवजी दोन दिवसांची वैधता दिली जाईल. 49 रुपयांप्रमाणे, हा प्लॅन 20GB च्या FUP मर्यादेसह देखील येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo
Compare items
  • Water Purifier (0)
  • Vacuum Cleaner (0)
  • Air Purifter (0)
  • Microwave Ovens (0)
  • Chimney (0)
Compare
0