Airtel चा Best रिचार्ज प्लॅन! तब्बल 15 OTT सब्स्क्रिप्शनसह मिळेल भरपूर 5G डेटा आणि Unlimited कॉलिंग 

HIGHLIGHTS

तब्बल 15 OTT सब्स्क्रिप्शनसह Airtel चा हा बजेट-फ्रेंडली प्रीपेड रिचार्ज प्लॅन

500 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये भरपूर फायदे उपलब्ध

दररोज 3GB डेटा आणि Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांपर्यंत मोफत

Airtel चा Best रिचार्ज प्लॅन! तब्बल 15 OTT सब्स्क्रिप्शनसह मिळेल भरपूर 5G डेटा आणि Unlimited कॉलिंग 

Airtel कंपनी आपल्या महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. Airtel आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स ऑफर करते. आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. Airtel चा हा बजेट-फ्रेंडली प्रीपेड रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना मोफत OTT Apps सह दैनंदिन डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि डेली SMS चे फायदे प्रदान करतो.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: OTT सब्स्क्रिप्शनसह JIO चे तीन Best प्लॅन्स, Unlimited 5G डेटासह Entertainment होणार जबरदस्त

विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला एकाच वेळी केवळ 1 किंवा 2 नव्हे तर तब्बल 15 OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळेल. तुम्हाला प्रत्येक OTT Appची स्वतंत्र सदस्यता घेण्याची आवश्यकता नाही. जाणून घेऊयात प्लॅनची ​​किंमत आणि सर्व बेनिफिट्स.

AIRTEL

Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन

कथित Airtel च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 499 रुपये आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटा मिळतो. म्हणजेच वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 84GB डेटाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच दररोज 100 मोफत SMS ची सुविधाही देण्यात आली आहे.

15 OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन

विशेष मुद्द्यावर येत आम्ही तुम्हाला सांगतो की, नक्कीच या प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनाची उत्तम सोय करून ठेवण्यात आली आहे. हा प्लॅन Airtel Xstream Play लाभ देतो. या बेनिफिट्ससह, वापरकर्त्यांना एकाच वेळी 15 पेक्षा जास्त OTT बेनिफिट्स पूर्णपणे मोफत मिळतील. यामध्ये SonyLIV, Erosnow सारख्या प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व समाविष्ट आहे. इतकंच नाही, तर या प्लॅनसोबत Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांपर्यंत मोफत उपलब्ध आहे.

इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा, अपोलो 24|7 सर्कल, फ्री हॅलोट्यून्स, विंक म्युझिक फ्री इ. फायदे देखील समाविष्ट आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo