भारती Airtel 500 रुपयांअंतर्गत प्रीपेड प्लॅनमध्ये 50GB पर्यंत डेटा आणि अमर्यादित 5G डेटा ऑफर करत आहे. काही ग्राहक Airtel कडून अल्प कालावधीसाठी भरपूर डेटासह प्लॅन शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही एक चांगली ऑफर आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या प्लॅनची किंमत, वैधता आणि मिळणारे सर्व बेनिफिट्स-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Airtel चा 489 रुपयांचा प्लॅन
भारती Airtel चा 489 रुपयांचा प्लॅन ट्रू अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 300 SMS आणि 50GB डेटासह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन अमर्यादित 5G डेटासह इतर Airtel Thanks बेनिफिट्ससह देखील येतो. प्लॅनमधील इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Apollo 24|7 Circle, मोफत HelloTunes आणि Wynk Music ची सुविधा देखील मिळणार आहे. मात्र, लक्षात घ्या की हा प्लॅन केवळ एका महिन्याच्या वैधतेसह म्हणजेच 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.
Airtel ची 489 रुपयांची ऑफर खासकरून अशा वापरकर्त्यांसाठी आहे. ज्यांना दैनंदिन डेटा छोट्या FUP पर्यंत मर्यादित ठेवायचे नाही. येथे प्लॅनसोबत दिलेला संपूर्ण 50GB डेटा फक्त एका दिवसात वापरता येतो.
5G स्पीडसह मिळेल डेटा
तुम्हाला येथे अनलिमिटेड 5G डेटा ऑफर देखील मिळत आहे. होय, जर तुमचा फोन 5G NSA (नॉन-स्टँडअलोन) ला सपोर्ट करत असेल आणि तुम्ही 5G कव्हरेज क्षेत्रात राहत असाल, तर तुम्हाला या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटाचा आनंद देखील घेता येईल. एवढेच नाही तर, Airtel चे इतर प्लॅन्स देखील आहेत, जे एकरकमी डेटासह येतात. जर तुम्हाला असे प्लॅन्स हवे असतील तर, यासाठी तुम्ही Airtel च्या 179 रुपये, 199 रुपये, 289 रुपये, 296 रुपये, 455 रुपये, 509 रुपये आणि 1,799 रुपयांचे प्लॅन खरेदी करता येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile