जर तुम्ही देखील AIRTEL कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अनेक परवडणारे प्लॅन्स आहेत. कंपनीकडे दीर्घकाळ वैधतेसह स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 455 रुपये इतकी आहे. हा प्लॅन जवळपास तीन महिन्यांच्या वैधतेसह येतो. यात तुमहाला कोणते बेनिफिट्स मिळतील ते बघुयात –
Survey
✅ Thank you for completing the survey!
Airtel चा 455 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या 455 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 6GB हाय स्पीड डेटा मिळतो. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांच्या घरी वाय-फाय आहे आणि त्यांना केवळ घराबाहेर मोबाईल डेटाचा उपयोग करायचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळणार आहे.
प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण वैधतेदरम्यान अमर्यादित लोकल आणि STD कॉलिंग मिळणार आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज SMS लाभ मिळणार नाही, तर एकाच वेळी 900 SMSचा लाभ मिळणार आहे.
इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, तीन महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कलचे मेंबरशिप, विंक म्युझिक आणि हॅलो ट्यून्सचे मोफत बेनिफिट आणि FASTAG वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे.
Airtel चा 129 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
कंपनीच्या स्वस्त प्लॅनमध्ये 129 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये कॉलींग बेनिफिट्स आणि 300 एसएमएस मॅसेजसह 1GB हाय-स्पीड डेटा मिळतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile