एका महिन्याच्या वैधतेसह AIRTEL चे चार स्वस्त प्लॅन्स , मिळेल भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंग

एका महिन्याच्या वैधतेसह AIRTEL चे चार स्वस्त प्लॅन्स , मिळेल भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
HIGHLIGHTS

AIRTEL चे चार परवडणारे प्लॅन्स बघा

प्लॅनमध्ये भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध असेल

संपूर्ण महिन्याच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स

भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये AIRTEL आणि JIO मध्ये चुरशीची स्पर्धा सुरु असते. Airtel ने वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रीपेड टॅरिफ प्लॅनमध्ये देखील बदल केले आहेत. ज्यामध्ये 31 दिवसांसाठी अधिक डेटा आणि अधिक सोयीसह येणाऱ्या प्लॅन्सचा समावेश आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 31 दिवसांच्या वैधतेसह आणि अधिक सुविधांसह येणाऱ्या प्लॅन्सबाबत ​​माहिती देणार आहोत. जाणून घेऊया…

हे सुद्धा वाचा : iQoo चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच, केवळ 16 मिनिटात पूर्ण चार्ज होईल, जाणून घ्या किंमत

AIRTEL चा 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या 319 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. हा प्लॅन एकूण 31 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये Apollo 24/7 Circle, Wink Music आणि मोफत HelloTune देखील आहेत. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल आणि मोफत म्युझिकचा आनंद घेऊ इच्छित असाल तर हा प्लॅन्स तुमच्यासाठी उत्तम ठरेल. या प्लॅनसह, तुम्हाला Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.

AIRTEL चा 296 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 25 GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS आणि 30 दिवस अमर्यादित कॉल्सची सुविधाही उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये  Apollo 24/7 Circle, Wink Music आणि Free HelloTune चा समावेश आहे.

AIRTEL चा 111 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

 AIRTEL च्या 111 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 MB डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 31 दिवसांच्या पूर्ण वैधतेसह 2.5 पैसे प्रति मिनिट लोकल आणि STD कॉल मिळतात.

AIRTEL चा 109 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या यादीतील सर्वात स्वस्त एअरटेल प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर 109 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 MB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये 99 रुपयांचा टॉक टाईम देखील मिळेल. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय 109 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5 पैसे प्रति मिनिट दराने लोकल आणि STD कॉल करता येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo