AIRTEL चे 3 जबरदस्त प्लॅन ! 200 रुपयांपेक्षा स्वस्त, महिन्याभराच्या वैधतेसह मिळेल 21 GB डेटा

AIRTEL चे 3 जबरदस्त प्लॅन ! 200 रुपयांपेक्षा स्वस्त, महिन्याभराच्या वैधतेसह मिळेल 21 GB डेटा
HIGHLIGHTS

200 रुपयांपेक्षा स्वस्त AIRTEL चे 3 प्लॅन्स

यामध्ये, एका महिन्याची वैधता उपलब्ध

प्लॅनमध्ये एकूण 21 GB डेटा मिळेल

AIRTEL ही देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. रिलायन्स JIO चे उत्तम आणि किफायतशीर प्लॅन्स असूनही, ती शर्यतीत कायम आहे. कंपनीकडे रिचार्ज प्लॅनची ​​मोठी यादी आहे. परंतु बहुतेक वापरकर्ते स्वस्त योजना शोधत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 3 रिचार्ज प्लॅन्स बद्दल सांगणार आहोत, जे 200 रुपयांपेक्षा स्वस्त आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला सुमारे एक महिन्याची वैधता मिळेल.

हे सुद्धा वाचा : OnePlus Nord Buds CE लवकरच भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

AIRTEL चा 155 रुपयांचा प्लॅन

AIRTELचा हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये एकूण 1 GB डेटा उपलब्ध आहे, जो 24 दिवसांत कधीही वापरता येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह एकूण 300 SMS दिले जातात. तसेच मोफत HelloTunes आणि Wink Music चा फ्री ऍक्सेस देखील मिळेल. 

AIRTEL चा 179 रुपयांचा प्लॅन

AIRTEL चा 179 रुपयांचा प्लॅन 28 दिवस चालतो. या प्लॅनमध्ये 2 GB डेटा मिळतो, जो 155 रुपयांच्या प्लॅनपेक्षा  दुप्पट आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह एकूण 300 SMS दिले जातात. तसेच मोफत HelloTunes आणि Wink Music चा फ्री ऍक्सेस मिळेल.

AIRTEL चा 209 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनचे दर 200 रुपयांपेक्षा जरा जास्त आहेत, पण यात फायदेदेखील जास्त मिळणार आहेत. यामध्ये, 21 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1 GB डेटा उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 21 GB  डेटा मिळू शकतो. यासोबत तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि HelloTunes, Wink Music चा फ्री ऍक्सेस  मिळतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo