Airtel चे 1 महिना आणि 30 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स, भरपूर डेटासह मिळेल Unlimited कॉलिंग आणि बरेच काही । Tech News

HIGHLIGHTS

तुम्हाला 1 महिना आणि 30 दिवसांच्या वैधतेसह येणारे अप्रतिम प्लॅन्स

30 दिवसांच्या वैधतेसहा येणाऱ्या प्लॅनची सुरुवातीची किंमत 199 रुपये

भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह मिळतील बरेच अप्रतिम फायदे

Airtel चे 1 महिना आणि 30 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स, भरपूर डेटासह मिळेल Unlimited कॉलिंग आणि बरेच काही । Tech News

जर तुम्ही एखादा प्लॅन शोधत असाल, ज्याची वैधता महिन्याभराच्या जवळपास किंवा एक महिन्याची असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. खरं तर, आज आम्ही तुम्हाला भारती Airtel च्या एका महिन्याच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. होय, आम्ही तुम्हाला 1 महिना आणि 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या अप्रतिम प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनसह तुम्हाला बरेच बेनिफिट्स मिळणार आहेत. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Airtel चा 319 रुपयांचा प्लॅन: 

आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्राहकांना त्यांचा नंबर 28 दिवसांनंतर नाही तर दर महिन्याला त्याच तारखेला रिचार्ज करावा लागेल. ज्या दिवशी आधी रिचार्ज केला होता. हा प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉल, 2GB डेटा प्रतिदिन, दररोज 100 SMS आणि Wynk Music आणि बऱ्याच अप्रतिम बेनिफिट्ससह येतो.

Airtel चा 359 रुपयांचा प्लॅन:

airtel

प्लॅनमध्ये 2GB दैनंदिन डेटा, मोफत अमर्यादित व्हॉइस, 100 SMS दिवस, आणि Wynk Music बेनिफिट  मासिक वैधतेसह मिळेल. त्याबरोबरच, ग्राहकांना या प्लॅनसह Airtel Extreme ऍपमध्ये देखील ऍक्सेस मिळेल.  

Airtel चा 509 रुपयांचा प्लॅन:

 एका महिन्याच्या वैधतेसह Airtel चा हा सर्वात महागडा रिचार्ज आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 60GB डेटा, एक महिना वैधता, मोफत लोकल आणि STD व्हॉईस कॉल आणि दररोज 100SMS दिवस मिळतात. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदेही मिळतील.

30 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स

Airtel चा 199 रुपयांचा प्लॅन 

 या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एकूण 3GB इंटरनेट डेटा देखील येतो. तसेच, प्लॅनमध्ये 300SMS देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. 

airtel

Airtel चा 296 रुपयांचा प्लॅन 

 प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, 25GB डेटा, 100 दैनिक SMS आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. त्याबरोबरच, प्लॅनमध्ये विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, फ्री हॅलोट्यून्स, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांचे Apollo सबस्क्रिप्शन दिले जाते. 

Airtel चा 489 रुपयांचा प्लॅन 

 या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 50GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS आणि मोफत व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, फ्री हॅलोट्यून्स, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांचे Apollo सबस्क्रिप्शन दिले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo