लाँच होण्याआधीच रिलायन्स जिओ 4G ची दहशत इतर सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये पाहायला मिळत आहे. असे सांगितले जात आहे की, १५ ऑगस्टला ही सेवा भारतात लाँच केली जाईल.
एअरटेल आणि आयडियानंतर आता वोडाफोननेही आपल्या डाटा पॅकने मिळणारा फायदा 67% टक्क्यांनी वाढवला आहे. म्हणजेच आता आपल्याला त्याच किंमतीत 67% जास्त डाटा मिळणार आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
आता आपण आपल्या आधीच्याच पॅकमध्ये 67% जास्त फायदा घेऊ शकता. हे आपल्याला एक अतिरिक्त फायद्याच्या रुपात दिला जाईल. म्हणजेच आपण आधी जेवढे पैसे मोजत आहात, तेवढेच मोजावे लागतील, फक्त ह्यासाठी आपल्याला आपल्याला 67% जास्त डाटा मिळेल.
ह्या नवीन ऑफरनुसार, आपल्याला वोडाफोन अनेक उत्कृष्ट ऑफर देत आहे, जसे की, 3GB 3G/4G मासिक रिचार्जची किंमत तीच राहणार आहे आणि त्यात आपल्याला जास्त डाटा मिळणार आहे. आता आपल्याला ६५० रुपयाच्या पॅकसह 67% जास्त फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ४४९ रुपयाच्या 3G/4G पॅकमध्येे आपल्याला 10GB डाटा मिळणार आहे. म्हणजेच जवळपास 54% अधिक फायदा होणार आहे.
त्याचबरोबर आपल्याला ३९ रुपयाच्या छोट्या पॅकसह ५ दिवसाची वैधता आणि 225MB डाटा मिळत होता. आता आपल्याला हा 160MB डाटा मिळणार आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला जवळपा ४१% चा फायदा होणार आहे. तसेच जर आपण १२ रुपयांचा 3G/4G पॅक वापरत असाल, तर आपल्यालासुद्धा जवळपास ६७% फायदा होणार आहे.