हा टॅबलेट 1.3GHz इंटेल एटम क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB DDR3 रॅम आणि इंटेल HD ग्राफिक्सने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
पेंटल टेक्नॉलॉजिसने भारतात आपला नवीन टॅबलेट पेंटा T-पॅड WS802X लाँच केला आहे. हा एक विंडोज १०वर आधारित टॅबलेट आहे आणि ह्याची किंमत ५,४९९ रुपये आहे. हा एक्सक्लुसिव्ह रुपात ऑनलाईन शॉपिंग साइट होमशॉप 18 वर उपलब्ध होईल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्या टॅबलेटच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ८ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा टॅबलेट 1.3GHz इंटेल एटम क्वाड कोर प्रोसेसर आणि 1GB DDR3 रॅम आणि इंटेल HD ग्राफिक्सने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 4000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, वायफाय, ब्लूटुथ, युएसबी OTG आणि मायक्रो- USB पर्याय दिले गेले आहे.
पेंटा T-पॅड WS802X बरीचशी वैशिष्ट्ये कंपनीचे मागील प्रॉडक्ट पेंटा T-पॅड WS802X शी बरेच मिळतेजुळते आहे. मात्र ह्या दोघांमधील अंतराविषयी बोलायचे झाले तर, कंपनीचे मागील प्रोडक्ट पेंटा T-पॅड WS802Q अॅनड्रॉईडवर चालत होता आणि त्याची किंमत ६,९९९ रुपये होती.