ZTE ब्लेड A1 स्मार्टफोन लाँच

ZTE ब्लेड A1 स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात रियर कॅमे-याच्या खाली फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला आहे, जो स्मार्टफोनच्या विशेष वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

मोबाईल निर्माता कंपनी ZTE ने आपला नवीन स्मार्टफोन ब्लेड A1 लाँच केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला चीनमध्ये सादर केले आहे. चीनमध्ये ह्याची किंमत ५९९ चीनी युआन (जवळपास ६,३०० रुपये) ठेवण्यात आली आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे आणि हा ११ डिसेंबरला रिलीज केला जाईल.

 

जर ZTE ब्लेड A1 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 293ppi आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz 64 बिट ऑक्टा-कोर मीडियाटेक MT6735 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-SD कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात रियर कॅमे-याच्या खाली फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला आहे, जो स्मार्टफोनच्या विशेष वैशिष्ट्यांपैकी एक आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो. हा एक ड्यूल सिम ड्यूल स्टँडबाय स्मार्टफोन आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये 2800mAh ची बॅटरी दिली गेली आहे. स्मार्टफोनचे डायमेंशन 142×70.2×8.9mm आहे. प्लॅस्टिक बिल्ड असलेला हा स्मार्टफोन स्मार्ट व्हाइट, वायब्रंड यलो, ड्रीम ग्रीन, कूल ब्लू आणि स्पेस ग्रे रंगात उपलब्ध होईल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo