झोलो 8X-1000i स्मार्टफोन लाँच

झोलो 8X-1000i स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 1.4GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक (MT6592M) प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ग्राफिक्ससाठी माली 450GPU इंटिग्रेटेड आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

मोबाईल निर्माता कंपनी झोलो ने आपला नवीन स्मार्टफोन 8X-1000i सादर केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे, त्याचबरोबर ह्याच्या किंमतीविषयीही माहिती दिली आहे. कंपनी साइटवर ह्या स्मार्टफोनला ६,९९९ किंमतीत लिस्ट केले आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडीलवर उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन बाजारात कधी उपलब्ध होणार ह्याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्याच्या डिस्प्लेची तीव्रता 294ppi आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षणसुद्धा आहे. हा स्मार्टफोन 1.4GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक (MT6592M) प्रोसेसर आणि 2GB DDR3 रॅमने सुसज्ज आहे. ग्राफिक्ससाठी माली 450GPU इंटिग्रेटेड आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या हाइव युआयवर चालतो, जो अॅनड्रॉईडवर आधारित आहे. झोलोचा हाइव युआय अॅनड्रॉईड 4.4.2 किटकॅटवर आधरित आहे आणि ह्याच्या लूकमध्ये अनेक बदल केले गेले आहेत.

कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 3G, वायफाय, मायक्रो-USB, A-GPS, GPRS/ एज आणि ब्लूटुथ दिला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 2G नेटवर्कवर ११ तासांपर्यंत आणि ३५२ तासांचा स्टँडबाय टाइम देण्यास सक्षम आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo