झेन सिनेमॅक्स 2 स्मार्टफोन लाँच

झेन सिनेमॅक्स 2 स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

स्मार्टफोन निर्माता कंपनी झेन मोबाईलने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सिनेमॅक्स 2 लाँच केला आहे. कंपनीने सिनेमॅक्स 2 स्मार्टफोनची किंमत ४,१९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लुसिव्हरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

 

जर झेन सिनेमॅक्स 2 स्मार्टफोनच्या वैशिषट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 540×960 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

त्याचबरोबर ह्यात LED फ्लॅशसह ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 2900mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPS, A-GPS आणि मायक्रो-USB आहे. हा हँडसेट ऑडियो कॉल रेकॉर्डरसह येईल.

५००० च्या किंमतीत येणा-या झेन सिनेमॅक्स 2 स्मार्टफोनचा सामना इंटेक्स अॅक्वा एयर असेल. हा स्मार्टफोन ४,६९० रुपयात उपलब्ध आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo