जुलै महिन्यापासून ऑफलाइन बाजारात मिळणार यू यूनिकॉर्न

जुलै महिन्यापासून ऑफलाइन बाजारात मिळणार यू यूनिकॉर्न
HIGHLIGHTS

मायक्रोमॅक्सच्या Yu टेलिवेंचर्सने असे सांगितले आहे की, जुलै महिन्यापासून यू यनिकॉर्न स्मार्टफोन ऑफलाइन माध्यमातून खरेदी करु शकता.

मायक्रोमॅक्सच्या Yu टेलिवेंचर्सने असे सांगितले आहे की, जुलै महिन्यापासून यू यनिकॉर्न स्मार्टफोन ऑफलाइन माध्यमातून खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनला आता फक्त ऑनलाइनच खरेदी करु शकता. लाँचच्या पहिल्या महिन्यापर्यंत १२,९९९ रुपये असणार आहे आणि त्यानंतर हा स्मार्टफोन १४,९९९ रुपयात मिळेल. ह्या स्मार्टफोनला आपण फ्लिपकार्टच्या माध्यमातून एक्सक्लूसिवरित्या खरेदी करु शकता. ७ जूनपासून फ्लॅश सेलच्या माध्यमातून आपण हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर खऱेदी करु शकता.


ह्या कंपनीेचे संस्थापक राहुल शर्माने असे सांगितले आहे की, “येणा-या काही दिवसात हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी ऑफलाइन उपलब्ध केला जाईल. “

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. हा डिवाइस 1.8GHz मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसरसह 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे आणि हे आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो. फोन 4000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – .. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

हा फोन अॅनड्रॉईड ऑन स्टेरॉयड्स (AOS) वर काम करतो. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर आधारित आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या फोनमध्ये मार्शमॅलोचे अपडेटसुद्धा खूपच लवकर मिळेल. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा आहे. ह्यात DTS ऑडियोचा सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे.

कंपनीने अॅनड्रॉईड यू 2.0 ला सुद्धा लाँच करेल, ज्याच्या माध्यमातून यूजर्स अनेक सेवा वापरु शकतात जशा की, कॅब्स, डॉक्टर्स, फूड वगैरे. जर यूजर्सने कॅब्स सर्विसेस निवडले तर त्याला उबर, ओला सारख्या सेवा मिळतील.

हेदेखील वाचा – यू यूनिकॉर्न विरुद्ध शाओमी रेडमी नोट 3: कोणता स्मार्टफोन आहे सरस
हेदेखील वाचा – लेनोवो ZUK Z2 स्मार्टफोनमध्ये आहे 4GB रॅम

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo