शाओमी Mi 5 चे फोटो आणि व्हिडियो लीक

HIGHLIGHTS

ह्या रेंडर फोटोंमध्ये ह्या स्मार्टफोनच्या ४ वेगवेगळ्या रंगांची माहिती मिळते. रेंडर इमेजमध्ये Mi 5 स्मार्टफोन ४ वेगवेगळ्या रंगात दिसत आहे.- काळा, सोनेरी,गुलाबी आणि पांढरा. हा स्मार्टफोन 2.5 कर्व्ड ग्लास डिस्प्ले आणि बॅक पॅनलवर 3D ग्लासच्या कव्हरने सुसज्ज असेल.

शाओमी Mi 5 चे फोटो आणि व्हिडियो लीक

मोबाईल निर्माता कंपनी शाओमी लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Mi5 सादर करेल. सध्यातरी ह्या स्मार्टफोनची रेंडर इमेज लीक झाली आहे, ज्यात स्मार्टफोनच्या चार वेगवेगळ्या रंगाची माहिती मिळते.त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनचा एक व्हिडियोसुद्धा समोर आला आहे, ज्याच्यामुळे ह्या स्मार्टफोनविषयी काही माहिती लीक झाली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

 

शाओमी Mi 5 चे फोटो विबो यूजरद्वारा जारी केले आहेत. ह्या रेंडर फोटोंमध्ये ह्या स्मार्टफोनच्या ४ वेगवेगळ्या रंगांची माहिती मिळते. रेंडर इमेजमध्ये Mi 5 स्मार्टफोन ४ वेगवेगळ्या रंगात दिसत आहे.- काळा, सोनेरी,गुलाबी आणि पांढरा. हा स्मार्टफोन 2.5 कर्व्ड ग्लास डिस्प्ले आणि बॅक पॅनलवर 3D ग्लासच्या कव्हरने सुसज्ज असेल. नवीन चित्रात ह्या स्मार्टफोनचे होम बटनसुद्धा दिसत आहे. होम बटन फिंगरप्रिंट सेंसर म्हणून काम करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

 

ह्या स्मार्टफोनशी संबंधित एक व्हिडियोसुद्धा जारी करण्यात आला आहे. ह्या व्हिडियोमध्ये ह्या स्मार्टफोनचे फ्रंट पॅनल दिसत आहे. २७ सेकंदाच्या ह्या व्हिडियोमध्ये Mi 5 ला लाकडाच्या डॉकवर ठेवून पाहिले जात आहे आणि एक यूजर काही वेळासाठी ह्या स्मार्टफोनच्या इंटरफेसलासु्द्धा अॅक्सेस करतो.

ह्याआधीही ह्या स्मार्टफोनशी संबंधित काही माहिती समोर आली होती. ती माहिती चीनची वेबसाइट Zaeke ने जारी केले होते. शाओमी Mi 5 स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेच्या खाली एक स्लिम होम बटण आहे. ह्याआधीसुद्धा स्मार्टफोनमध्ये होम बटन असण्याचीसुद्धा माहिती मिळाली होती. ह्यात मेटल फ्रेमआहे आणि त्याचबरोबर ड्यूल स्पीकर ग्रील आणि USB टाइप-C पोर्टसुद्धा आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo