Xiaomi Redmi Y2 स्मार्टफोन पुन्हा येणार आहे सेल साठी… जाणून घ्या ऑफर्स

Updated on 10-Jul-2018
HIGHLIGHTS

Xiaomi च्या दुसर्‍या जेनेरेशन चा सेल्फी स्मार्टफोन Xiaomi Redmi Y2 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला होता, याच्या लॉन्च नंतर हा डिवाइस कित्येकदा सेल साठी आला आहे. आज पण हा डिवाइस दुपारी 12 वाजल्यापासून सेल साठी येणार आहे, अमेजॉन इंडिया वर याचा सेल होईल.

Xiaomi Redmi Y2 Goes on Sale Today on Amazon India at 9999: Xiaomi च्या दुसर्‍या जेनेरेशन चा सेल्फी स्मार्टफोन Xiaomi Redmi Y2 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला होता, याच्या लॉन्च नंतर हा डिवाइस कित्येकदा सेल साठी आला आहे. आज पण हा डिवाइस दुपारी 12 वाजल्यापासून सेल साठी येणार आहे, अमेजॉन इंडिया वर याचा सेल होईल. 

या डिवाइस ची किंमत पाहता हा भारतात दोन वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या डिवाइस ची बेसिक किंमत Rs 9,999 आहे. या किंमतीत तुम्ही याचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट घेऊ शकता. त्याचबरोबर या डिवाइस चा एक 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वाला वेरिएंट पण आहे. हा मॉडेल तुम्ही Rs 12,999 च्या किंमतीत काही कलर ऑप्शन जसे की एलिगेंट गोल्ड, रोज गोल्ड आणि डार्क ग्रे रंगांमध्ये घेऊ शकता. 

फोन सोबत तुम्हाला Rs 1800 cha इंस्टेंट कॅशबॅक एयरटेल कडून मिळत आहे. त्याचबरोबर तुम्ही या डिवाइस सोबत एयरटेल कडून तुम्हाला दिला जाणारा 240GB डाटा पण फ्री मध्ये वापरु शकता. लक्षात घ्या हा कॅशबॅक तुम्हाला कंपनी कडून म्हणजे एयरटेल कडून 36 डिस्काउंट कूपन्स च्या रूपात दिला जाणार आहे, यांची किंमत Rs 50 असेल. 

Xiaomi Redmi Y2 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.99-इंचाचा IPS डिस्प्ले मिळत आहे. तुम्हाला ही स्क्रीन 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळत आहे. फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर मिळत आहे, हा प्रोसेसर आपण Xiaomi Redmi Note 5 डिवाइस मध्ये पण बघितला होता. फोन ची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने वाढवू शकता. याची स्टोरेज तुम्ही 256GB पर्यंत वाढवू शकता. 

फोन मधील कॅमेरा पाहता यात तुम्हाला एक 12+5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा मिळत आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये एक 3080mAh क्षमता असलेली बॅटरी पण देण्यात आली आहे. 
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :