शाओमी रेडमी प्रोमध्ये असणार डेका कोर प्रोसेसर?

शाओमी रेडमी प्रोमध्ये असणार डेका कोर प्रोसेसर?
HIGHLIGHTS

ह्याआधी आलेल्या टीजरनुसार, शाओमी रेडमी प्रोमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे.

शाओमी आपल्या लवकरच येणा-या स्मार्टफोन रेडमी प्रो संदर्भात एक नवीन टीजर समोर आणला आहे. ह्या नवीन टीजरनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये OLED डिस्प्ले आणि डेका कोर प्रोसेसर असणार आहे. ह्याआधी भारतात जोपोने आपला असाच एक स्मार्टफोन लाँच केला आहे, जो जगातील पहिला डेका-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनचे नाव आहे जोपो स्पीड 8.

ह्याआधी ह्या स्मार्टफोनला घेऊन अनेक अफवा समोर आल्या होत्या. आणि आता असे सांगितले जात आहे की, ह्या स्मार्टफोनला २६ जुलैला लाँच केले जाईल. आणि ह्याविषयी कंपनीने वेइबोवर एक पोस्टसुद्धा केले आहे.

हेदेखील पाहा – [ Marathi] HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ

त्याचबरोबर ह्या पोस्टमध्ये असेही सांगितले आहे की, रेडमी प्रो सह आणखी एक छोटा डिवाइससुद्धा लाँच केला आहे. तथापि, कंपनीने ह्याविषयी अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ह्या छोट्या डिवाइसमध्ये नेमके काय असेल हे सांगणे थोडे अवघडच आहे.

हेदेखील वाचा – आयडिया पुन्हा एकदा कमी केले आपले डाटा रेट्स
हेदेखील वाचा – नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये असणार 2K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर?

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo