शाओमी रेडमी नोट ३ ही आज होणार लाँच

शाओमी रेडमी नोट ३ ही आज होणार लाँच
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन मिडियाटेक हेलियो X10 MT6795 चिपसेट, 2GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. ह्यात 16GB/32GBचे अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे. तसेच ह्यात 2GB/3GB रॅम असू शकते.

मोबाईल निर्माता कंपनी शाओमी आज आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 3 सादर करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरे पाहता, ह्याआधी शाओमीचे सहसंस्थापक आणि प्रेसिडेंट लिन बीनने अशी माहिती दिली होती की, २४ नोव्हेंबरला नोट सीरिजमध्ये आपले नवीन डिवाईस रेडमी नोट २ प्रो प्रदर्शित करेल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रेडमी नोट प्रोसह रेडमी नोट ३ ला सादर करेल.

 

श्याओमी रेडमी नोट 3 स्मार्टफोन सोनेरी, चंदेरी आणि राखाडी ह्या तीन रंगात उपलब्ध होईल. तसेच लीक झालेल्या रेडमी नोट 3 यूनीबॉडी मेटलने बनवली आहे आणि बॅक पॅनलमध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे.

जर शाओमी रेडमी नोट ३ स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांवाषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले असू शकते, ज्याचे रिझोल्युशन 1920×1280 पिक्सेल असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो X10MT6795 चिपसेट, 2GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज असू शकते. ह्यात 16GB/32GB चे अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ह्यात 2GB/3GB रॅम असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

त्याचबरोबर ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असू शकतो. शाओमी रेडमी नोट 3 अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.0 लॉलीपॉपसह युआय ७ वर आधारित असेल. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्ट, ब्लूटुथ, वायफाय आणि GPS उपलब्ध होईल.

शाओमी आज रेडमी नोट 2 प्रो आणि रेडमी नोट 3सह Mi पॅड २ सुद्धा सादर करेल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo