शाओमी Mi 4 चा विंडोज व्हर्जन होेणार ३ डिसेंबरला लाँच

शाओमी Mi 4 चा विंडोज व्हर्जन होेणार ३ डिसेंबरला लाँच
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यातसुद्धा 3G, वायफाय आणि ब्लूटुथ व्यतिरिक्त 4G LTE सपोर्ट आहे.

मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने आपला स्मार्टफोन Mi 4 च्या विंडोज व्हर्जनला 3 डिसेंबरला लाँच करेल. शाओमीचे सहसंस्थापक लीन बिन ने चीनी सोशल नेटवर्किंग साइट वेइबोवर ह्या फोनसह एक फोटोग्राफसुद्धा पोस्ट केली आहे. फोटोसह बिनने माहिती दिली आहे की, हा विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम आधारित Mi 4 फोन आहे, ज्याला ३ डिसेंबरला लाँच केले जाईल.

 

मार्च २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम सादर केला होता आणि त्याचवेळी कंपनीने अशी माहिती दिली होती की, विंडोज १० साठी शाओमीसह भागीदारी केली आहे.

जर ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, शाओमी Mi 4 च्या विंडोज व्हर्जनचे फीचर्ससुद्धा ह्याच्या अॅनड्रॉईड व्हर्जनसारखेच असतील. ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेट, 2.5GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB किंवा 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असू शकते.

ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात 3G, वायफाय आणि ब्लूटुथशिवाय 4G LTE सपोर्टसुद्घा आहे.

शाओमी Mi 4 विंडोज संस्करणशिवाय कंपनीचा आणखी एक डिवाइस विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. शाओमीने अलीकडेच रेडमी नोट 3 च्या लाँचसह Mi पॅड 2 चे प्रदर्शन केले होते. हा टॅबलेटसुद्धा अॅनड्रॉईडशिवाय विंडोज संस्करणमध्ये उपलब्ध होईल. शाओमी Mi  नोट प्रो डिवाइसवर काम करत आहे, जो विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर उपलब्ध होईल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo