आकर्षक डिझाइनसह Vivo Y77 5G स्मार्टफोन लाँच, मिळेल 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज

आकर्षक डिझाइनसह  Vivo Y77 5G स्मार्टफोन लाँच, मिळेल 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
HIGHLIGHTS

Vivo Y77 5G स्मार्टफोन आज लाँच

स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत अंदाजे 18,000 रुपये

Vivo Y77 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे

Vivo ने शुक्रवारी म्हणजेच आज आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y77 5G चीनमध्ये लाँच केला. MediaTek Dimension 930 प्रोसेसरसह लॉन्च केलेला हा पहिला स्मार्टफोन आहे. हा फोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. Vivo Y77 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 4500mAh बॅटरी आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, चीनी कंपनीने मलेशियामध्ये सुद्धा Vivo Y77 5G नावाचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. पण या व्हेरियंटचे स्पेसिफिकेशन्स चीनमध्ये लॉन्च केलेल्या व्हेरियंटपेक्षा वेगळे आहेत. चीनमध्ये लॉन्च झालेल्या Vivo Y77 5G ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सर्वकाही जाणून घ्या…

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Lava ने फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला स्मार्टफोन, मिळेल iPhone सारखी डिझाईन

Vivo Y77 5G किंमत

Vivo Y77 5G स्मार्टफोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Vivo China store वर CNY 1,499 म्हणजेच अंदाजे 18,000 रुपये आहे. त्याच वेळी, 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,599 CNY म्हणजेच सुमारे 19,000 रुपये आहे. 8 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,799 CNY म्हणजेच सुमारे 21,000 रुपये आणि 12 GB रॅम + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,999 CNY म्हणजेच सुमारे 24,000 रुपये आहे. हा फोन क्रिस्टल ब्लॅक, क्रिस्टल पावडर आणि क्रिस्टल सी कलरमध्ये उपलब्ध असेल. चीनमध्ये 11 जुलैपासून हँडसेटची विक्री सुरू होणार आहे.

त्याबरोबरच, Vivo ने हा फोन मलेशियामध्ये MYR 1,299 म्हणजेच सुमारे 23,000 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे आणि तो 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो.

Vivo Y77 5G चे स्पेसिफिकेशन्स 

हँडसेटमध्ये 6.64-इंच लांबीचा LCD IPS डिस्प्ले आहे, जो फुल HD + (1,080×2,388 पिक्सेल) रिझोल्यूशनसह येतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्ले 120Hz नॉर्मल मोड आणि 240Hz गेमिंग मोडसह दोन टच सॅम्पलिंग रेटना सपोर्ट करतो. या Vivo फोनमध्ये MediaTek Dimensity 930 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे.

Vivo Y77 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर एफ/2.0 अपर्चरसह आहे. दोन्ही कॅमेरे फुल-HD व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

Vivo Y77 5G स्मार्टफोन Android 12 आधारित OriginOS Ocean UI सह येतो. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, जी 80W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. प्रोटेक्शनसाठी हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि Face Wake Facial रिकग्निशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हँडसेटची डायमेंशन  164.17×75.8×8.59 मिलीमीटर आणि वजन 194 ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन ब्लूटूथ 5.3 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo