हा फोन 1.2GHz स्नॅपड्रॅगन 410 क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
जर विवो Y31L स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4.7 इंचाची QHD मल्टीटच आणि कॅपेसिटीव्ह डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 960×540 पिक्सेल आहे. हा फोन 1.2GHz स्नॅपड्रॅगन 410 क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 16GB च्या अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. फोटो अजून आकर्षक बनविण्यासाठी ब्यूटी, पॅनोरमा,एचडीआर आणि वॉटरमार्क मोडसारखे वैशिष्ट्य दिले गेले आहे. अॅनड्रॉइड 5.1 लॉलीपॉपवर चालणारा हा फोन फनटच ओएस 2.1 सह येतो. स्मार्टफोनवर पॉवर देण्यासाठी 2200mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये USB, वाय-फाय, ब्लूटुथ आणि OTG वैशिष्ट्ये दिली गेली आहेत. त्याशिवाय ह्या फोनचे परिमाण 137.24×68.76×8.39mm आणि वजन 133 ग्रॅम आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपास सारखे सेंसरसुद्धा आहे. फोनमध्ये पांढ-या आणि काळ्या रंगात उपलब्ध होईल.