64MP मेन कॅमेरासारख्या उत्कृष्ट फीचर्ससह Latest Vivo Y200 5G भारतात लाँच, बजेटमध्ये येईल का किंमत?
Vivo Y200 5G स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारपेठेत लाँच
फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये 64MP आणि 2MP बोकेह लेन्स देखील आहेत, जे ऑरा लाइटसह येतात.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 चिपसेट देण्यात आली आहे.
Vivo Y200 5G ची चर्चा मागील काही काळापासून सुरु होती, आता हा फोन भारतात लाँच झाला आहे. हा फोन आकर्षक डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. याशिवाय, नवीन हँडसेटमध्ये 64MP कॅमेरा आणि एक बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. लेटेस्ट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतील Xiaomi, Samsung, Oppo आणि Realme सारख्या ब्रँडच्या मोबाईल फोनशी जबरदस्त स्पर्धा करेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता Vivo Y200 ची किंमत बघुयात.
SurveyIntroducing the sleek, stylish and extraordinary vivo Y200 5G!
— vivo India (@Vivo_India) October 23, 2023
Elevate your mobile experience with lightning-fast speed and stunning features.
Buy now! https://t.co/Mvp38dM0ID#SpreadYourAura #vivoY200 #ItsMyStyle #5G #vivo#vivoYSeries pic.twitter.com/kCBp9Rssk4
हे सुद्धा वाचा: Vodafone Idea चे अप्रतिम रिचार्ज प्लॅन्स! 20 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय Unlimited डेटा, बघा वैधता
Vivo Y200 5G ची किंमत
Vivo Y200 5G स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल अनेक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध करून दिला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.
Vivo Y200 5G चे फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स
Vivo Y200 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. तसेच प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 चिपसेट देण्यात आली आहे. यासह फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे. हा मोबाईल Android 13 वर काम करतो.

कॅमेरा डिटेल्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये 64MP आणि 2MP बोकेह लेन्स देखील आहेत, जे ऑरा लाइटसह येतात. तसेच, याद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. त्याबरोबरच लाइव्ह, पोर्ट्रेट आणि नाईट मोड इ. कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत. आकर्षक सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.
पॉवरसाठी Vivo Y200 5G मध्ये 4800mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी यात फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक तसेच Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile