HIGHLIGHTS
Vivo Y16 स्मार्टफोनच्या किमतीत कपात
स्मार्टफोनची नवीन किंमत 1 जून 2023 पासून लागू करण्यात आली आहे.
स्मार्टफोन MediaTek Helio P35 चिपसह सुसज्ज आहे.
Vivo Y16 स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. फोनची किंमत जवळपास 1800 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. तुम्हाला सांगतो की, स्मार्टफोन 31 मे 2023 रोजी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुमारे 13,799 रुपयांमध्ये उपलब्ध होता. पण Vivo ने 1 जून पासून Vivo Y16 च्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.
Surveyतुम्ही Vivo Y16 स्मार्टफोनचे 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय, ग्राहकांना Vivo V-Shield Protection Plan सारखे इतरही काही फायदे मिळतील. Vivo Y16 स्मार्टफोनची नवीन किंमत 1 जून 2023 पासून लागू करण्यात आली आहे. 1 जूनपासून तुम्ही Vivo Y16 स्मार्टफोन अधिकृत Vivo स्टोअर आणि चॅनल पार्टनरकडून फक्त 11,999 रुपयांमध्ये स्वस्तात खरेदी करू शकता.
फोन 6.51-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले ऑफर करतो. स्मार्टफोन MediaTek Helio P35 चिपसह सुसज्ज आहे. यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 13MP चा आहे. याशिवाय 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, समोर 5MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फेसवॉक फीचर आणि अनलॉक फीचर उपलब्ध आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile