Vivo ने स्वस्त केले दोन अप्रतिम स्मार्टफोन्स, नव्या आणि कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Vivo ने स्वस्त केले दोन अप्रतिम स्मार्टफोन्स, नव्या आणि कमी किमतीत खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

Vivo y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोनच्या किमतीत कपात

दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतीत एक हजार रुपयांची घट

प्रोसेसर वगळता दोन्ही स्मार्टफोनचे स्पेक्स समान आहेत.

Vivo ने विशेषतः ऑफलाईन मार्केटसाठी काही स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यामध्ये कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला Vivo y100 आणि Vivo Y100A असे दोन फोन लाँच केले होते. Vivoने 20 हजारांहून अधिक बजेटमध्ये हे फोन लाँच केले होते. मात्र, आता ब्रँडने त्यांची किंमत कमी केली आहे. यासह काही ऑफर्सदेखील कंपनीकडून जारी करण्यात आले आहेत. 

स्पेक्सबद्दल थोडक्यात बोलायचे झाल्यास, Vivo Y100 मध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर देण्यात आला आहे, तर Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर Vivo V100A मध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर वगळता दोन्ही फोनचे स्पेक्स सारखे आहेत. स्मार्टफोन्समध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 4500mAh बॅटरी समाविष्ट आहे. 

Vivo y100 आणि Vivo Y100A ची नवी किंमत 

Vivo ने Vivo Y100 आणि Vivo Y100A हे दोन्ही स्मार्टफोन्स 24,999 रुपये किमतीत लॉन्च केले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, कंपनीने घोषणा केली आहे की दोन्ही स्मार्टफोन (8GB+128GB) 1000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध असतील. तुम्ही हे स्मार्टफोन्स 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. 

Vivo Y100A चा हायर व्हेरिएंट देखील आहे. यात वापरकर्त्यांना 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळेल. या व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. Vivo ने त्याची किंमत 24,999 रुपये इतकी  केली आहे.

ऑफर्स 

या स्मार्टफोन्सवर ब्रँड काही आकर्षक ऑफर्स देत ​​आहे. बँक ऑफर अंतर्गत यावर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. म्हणजेच, तुम्हाला हे स्मार्टफोन्स 21,999 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. ही ऑफर SBI, ICICI बँक, IDFC बँक, फेडरल बँक, येस बँक आणि AU बँक कार्ड्सवर उपलब्ध आहे. तसेच, ही ऑफर EMI व्यवहारांवरही मिळणार आहे. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत साईटला भेट द्या. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo