आगामी Vivo V30e चे भारतीय लाँच कन्फर्म! रियर आणि फ्रंट दोन्हीकडे मिळेल 50MP कॅमेरा आणि बरेच अप्रतिम फीचर्स। Tech News 

आगामी Vivo V30e चे भारतीय लाँच कन्फर्म! रियर आणि फ्रंट दोन्हीकडे मिळेल 50MP कॅमेरा आणि बरेच अप्रतिम फीचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo भारतात आपल्या V30 सिरीजचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Vivo V30e भारतीय बाजारात लाँच करणार आहे.

या फोनचे प्रोडक्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर ब्रँडने लाइव्ह केले आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo भारतात आपल्या V30 सिरीजचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. या सिरीजअंतर्गत Vivo V30 आणि Vivo V30 Pro आधीच भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे स्मार्टफोन मिड बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. जे अनुक्रमे 33,999 रुपये आणि 41,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. दरम्यान, आता कंपनी या सिरीज अंतर्गत भारतात Vivo V30e स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V30e चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

हे सुद्धा वाचा: Realme P1 5G VS Moto G64 5G: नुकतेच लाँच झालेल्या लेटेस्ट Affordable स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त स्पर्धा, कोण आहे बेस्ट? Tech News

Vivo V30e चे भारतीय लाँच

Vivo ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Vivo V30e भारतीय बाजारात लाँच करणार आहे. या फोनचे प्रोडक्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर ब्रँडने लाइव्ह केले आहे. जिथे आगामी Vivo फोनचे फोटो आणि अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत. Vivo V30e स्मार्टफोन वेल्वेट रेड आणि सिल्क ब्लू कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

एवढेच नाही तर, कंपनीच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर Coming Soon कॅप्शनसह एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. सध्या, कंपनीने फोनची लाँच डेट उघड केली नाही परंतु Vivo V30e भारतात एप्रिलच्या अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Vivo V30e चे अपेक्षित तपशील

Vivo V30e कर्व डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही एक अल्ट्रा स्लिम 3D स्क्रीन असणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्याबरोबरच, Vivo V30E स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करेल. यात 50MP चा पोर्ट्रेट कॅमेरा देखील दिला जाईल, जो Sony IMX882 सेंसर असेल. तसेच, फोन 50MP फ्रंट कॅमेरासह लॉन्च केला जाईल. ही ऑटो फोकस लेन्स असेल, असे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Vivo V30e camera & battery details leaked

पॉवरसाठी या फोनमध्ये 5,500 mAh बॅटरी दिली जाईल. हा फोन 4 वर्षांच्या बॅटरी लाइफसह आणले जात आहे त्यामुळे ते वापरकर्त्यांना दीर्घकाळ समर्थन देईल, असे देखील कंपनीच्या अधिकृत साईटद्वारे उघड करण्यात आले आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, लीकनुसार हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 6 Gen 1 octacore प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo