Vivo V30e 5G फोनची पहिली Sale भारतात सुरु, जबरदस्त ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन। Tech News 

Vivo V30e 5G फोनची पहिली Sale भारतात सुरु, जबरदस्त ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo V30e 5G या महिन्याच्या सुरुवातीला भारतात लाँच करण्यात आला.

ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर स्मार्टफोनची पहिली विक्री सुरु

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा लेटेस्ट Vivo V30e 5G या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता. दरम्यान, आज म्हणजेच 9 मे रोजी या स्मार्टफोनची पहिली विक्री आहे, जी ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर थेट झाली आहे. या डिव्हाइसवर आश्चर्यकारक ऑफर्स उपलब्ध आहेत. हा नवा स्मार्टफोन आकर्षक डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V30e 5G फोनच्या पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Vivo V30e 5G किंमत आणि ऑफर

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V30e च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. तर, त्याचे 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँकेकडून 2800 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, फोनवर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. याव्यतिरिक्त, लेटेस्ट फोनवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरही मिळणार आहेत. येथून खरेदी करा

Vivo V30e
Vivo V30e

Vivo V30e 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V30e 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. सुरळीत कामकाजासाठी, या फोनमध्ये Qualcomm चे Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळणार आहे. त्याबरोबरच, डिवाइस Android 14 आधारित Funtouch OS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. यात OISसह 50MP प्रायमरी सेन्सर आहे. याशिवाय, सेटअपमध्ये 8MP वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. सेल्फीचे शौकीन असलेल्या लोकांसाठी हा फ्रंट कॅमेरा अगदी योग्य आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 5500mAh ची जंबो बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo