Vivo T4 5G launch with 7300mAh battery in India Today
Vivo T4 5G Launched: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात Vivo T4 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा विवो स्मार्टफोन जंबो बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा भारतातील सर्वात मोठा बॅटरी पॅक असलेला फोन आहे. तसेच, इतक्या मोठ्या बॅटरी पॅकसह येणारा हा भारतातील सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन कॉम्पॅक्ट आकारात आणला गेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo T4 5G स्मार्टफोनची किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: 10,000 रुपयांअंतर्गत खरेदी करा Best जबरदस्त Tablets, प्रचंड सवलतीसह खरेदीची संधी
Vivo T4 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबरच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या फोनचा टॉप व्हेरिएंट 23,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 29 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरून खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI आणि HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. तसेच, 2000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जाईल.
Vivo स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन शक्तिशाली 4nm स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 SoC सह येतो. फोनची जाडी 0.789 ग्रॅम आहे, ज्याचे वजन 199 ग्रॅम आहे. या फोनमध्ये AI आय प्रोटेक्शन सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानामुळे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याला फार नुकसान होणार नाही.
फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस OIS सह 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, मागील बाजूस 2MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या Vivo स्मार्टफोनमध्ये 7,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर तुम्ही 8.5 तासांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. Vivo T4 5G स्मार्टफोन 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येतो.