लेटेस्ट Vivo T3x 5G ची पहिली Sale आजपासून होणार सुरु, जबरदस्त ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 

लेटेस्ट Vivo T3x 5G ची पहिली Sale आजपासून होणार सुरु, जबरदस्त ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

नवीनतम स्मार्टफोन Vivo T3x 5G नुकतेच भारतीय बाजारात लाँच झाला आहे.

24 एप्रिलपासून या नव्या Vivo T3x 5G स्मार्टफोनची भारतात पहिली विक्री सुरु होणार आहे.

या फोनवर HDFC आणि SBI कडून 1500 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.

Vivo चा नवीनतम स्मार्टफोन Vivo T3x 5G नुकतेच भारतीय बाजारात लाँच झाला आहे. दरम्यान, आज म्हणजेच 24 एप्रिलपासून या नव्या Vivo T3x 5G स्मार्टफोनची भारतात पहिली विक्री सुरु होणार आहे. हे डिव्हाईस ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येईल. फोनच्या पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला उत्तम ऑफर्स मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात Vivo T3x 5G स्मार्टफोनची किंमत आणि पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्स-

Vivo T3x 5G ची किंमत आणि ऑफर

Vivo T3X 5G फोनच्या 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनच्या 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB + 128GB स्टोरेज मॉडेल 16,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. लेस्टियल ग्रीन आणि क्रिमसन ब्लिस कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Vivo T3x 5G with 50MP camera & 6000mAh battery to launch in India tomorrow: All you need to know

त्याबरोबरच, पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर HDFC आणि SBI कडून 1500 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. हा फोन नो-कॉस्ट EMI वर देखील खरेदी करता येईल.

Vivo T3x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo T3x 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकचा सपोर्ट आहे. पाणी आणि धुळपासून संरक्षण करण्यासाठी या फोनला IP64 ची रेटिंग देखील मिळाली आहे.

vivo t3x 5g
vivo t3x 5g

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP प्रायमरी आणि 2MP सेकंडरी सेन्सर आहे. तर, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, पोर्ट्रेट, लाइव्ह आणि HDR सारख्या कॅमेरा फीचर्स देखील फोनमध्ये उपलब्ध आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 6000mah ची मजबूत बॅटरी दिली आहे, जी 44W फ्लॅश चार्ज सपोर्टसह येते.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo