Vivo आणि Jioची भागीदारी: Vivo X80 वर भारतात 5G नेटवर्कची चाचणी

Vivo आणि Jioची भागीदारी: Vivo X80 वर भारतात 5G नेटवर्कची चाचणी
HIGHLIGHTS

भारतात 5G नेटवर्कच्या चाचणीसाठी Vivo आणि Jioची भागीदारी

चाचणीमध्ये, Jio च्या 5G नेटवर्कवर Vivo X80 सिरीज फोनमध्ये डाउनलोडींग, अपलोडींग आणि कॉलिंगचा अनुभव तपासला जाईल.

Vivo X80 सीरिजच्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 54,999 रुपये.

स्मार्टफोन निर्माता Vivo आणि टेलिकॉम कंपनी Jio यांनी 5G चाचण्यांसाठी भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारी अंतर्गत, Vivo X80 सिरीजमधील फोनवर भारतात 5Gचा प्रयोग केला जात आहे. चाचणी दरम्यान, Vivo X80 सिरीजमधील फोनवर 4K व्हिडिओंची लॅग-फ्री म्हणजे विना अटकल्याने स्ट्रीमिंग झाली आहे. चाचणीमध्ये, Jio च्या 5G नेटवर्कवर Vivo X80 सिरीजमधील फोनमध्ये डाउनलोड करणे, अपलोड करणे आणि कॉल करण्याचा अनुभव कसा आहे हे तपासले जाईल.

भागीदारीबद्दल भाष्य करताना Vivo इंडियाच्या ब्रँड स्ट्रॅटेजीचे संचालक, पैघम दानिश म्हणाले, "आम्ही वापरकर्त्यांना 5G इनेबल डिव्‍हाइसेसची संपूर्ण रेंज देण्यासाठी आणि Jioच्‍या भागीदारीत एंड-टू-एंड 5G इकोसिस्टम तयार करण्‍यासाठी तयार आहोत. Jio सोबत दीर्घकाळासाठी भागीदारी केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे."

Vivo X80 सिरीजबद्दल माहिती 

गेल्या 18 मे रोजी Vivo ने Vivo X80 सीरीज भारतात लाँच केली आहे. या सीरीज अंतर्गत Vivo X80 आणि Vivo X80 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. Vivo X80 आणि Vivo X80 Pro नुकतेच चीन आणि मलेशियामध्येही लाँच झाले आहेत. ही नवीन सिरीज गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo X70 मालिकेची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. यापैकी Vivo X80 मध्ये MediaTek Dimensity 9000 आणि Vivo X80 Pro मध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे.

फोनच्या कॅमेरासह Zeissचा सपोर्ट दिला गेला आहे. त्याबरोबरच, कॅमेर्‍यासोबत सिनेमॅटिक स्टाइल बोकेह, सिनेमॅटिक व्हिडिओ बोकेह आणि 360 डिग्री हॉरिझन्टल लेबल स्टॅबिलायझेशन देण्यात आले आहे. दोन्ही फोनमध्ये, Vivo ने Vivo V1+ इमेजिंग चिप दिली आहे. ज्यात लो लाईटसाठी AI व्हिडिओ एन्हांसमेंटचा देखील सपोर्ट आहे.

Vivo X80 सिरीजची किंमत : 

Vivo X80 Pro च्या 256 GB स्टोरेजसह 12 GB RAM वेरीएंटची किंमत 79,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे, Vivo X80 च्या 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज वेरीएंटची किंमत 54,999 रुपये आहे. तसेच, 256 GB स्टोरेजसह 12 GB रॅमची किंमत 59,999 रुपये आहे. याशिवाय, Vivo X80 Pro कॉस्मिक ब्लॅक आणि Vivo X80 अर्बन ब्लू आणि कॉस्मिक ब्लॅक या कलर ऑप्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo