तब्बल दोन सेल्फी कॅमेऱ्यांसह भारतात धमाकेदार एंट्री करेल Xiaomi 14 Civi, Flipkart लिस्टिंग LIVE
आगामी स्मार्टफोन Xiaomi 14 Civi भारतात 12 जून रोजी लाँच होणार
Xiaomi 14 Civi फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर LIVE केली आहे.
Xiaomi 14 Civi फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येईल.
Xiaomi च्या आगामी स्मार्टफोन Xiaomi 14 Civi भारतात 12 जून रोजी लाँच होणार आहे. कंपनीने काही काळापूर्वी फोनच्या लाँच डेटची पुष्टी केली होती. आता अखेर या फोनच्या फीचर्सशी संबंधित तपशील समोर आले आहेत. हा फोन सर्व फीचर्ससह Flipkart वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगद्वारे अनेक फीचर्स उघड झाले आहेत. विशेष म्हणजे Xiaomi चा हा फोन ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह येईल, असे देखील सांगण्यात आले आहेत. चला तर मग बघुयात Xiaomi 14 Civi बद्दल सर्व तपशील-
SurveyAlso Read: Nothing लवकरच लाँच करणार आपला नवा स्मार्टफोन! टीजर पोस्टरमध्ये बघा पहिली झलक। Tech News
Xiaomi 14 Civi Flipkart लिस्टिंग
Get ready for epic groupfies that'll have everyone saying "cheese!"
— Xiaomi India (@XiaomiIndia) June 4, 2024
Introducing the #Xiaomi14CIVI with a super-fun Dual Selfie Camera. Now you can capture all your besties in stunning detail, no one left behind!#CinematicVision launching on 12th June'24!
Stay tuned:… pic.twitter.com/W85AzXoLXh
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Xiaomi 14 Civi फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर LIVE केली आहे. म्हणजेच, हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. तसेच, या सूचीद्वारे फोनबाबत महत्त्वाची माहिती देखील पुढे आली आहे. हा फोन Crusie Blue, Matcha Green आणि Shadow Black कलर ऑप्शन्समध्ये येईल.
Xiaomi 14 Civi चे तपशील
Flipkart लिस्टिंगनुसार, Xiaomi 14 Civi फोन 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळणार आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K पिक्सेल असेल. त्याबरोबरच, डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनचे समर्थन देखील असेल. तसेच, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 14-आधारित HyperOS वर कार्य करेल, असे देखील उघड झाले आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा दिला जाईल, ज्यासह Leica Summilux लेन्सचा सपोर्ट असेल. त्याबरोबरच, या फोनमध्ये 50MP पोर्ट्रेट टेलीफोटो सेन्सर दिला जाईल, ज्यासोबत 2X झूम सपोर्ट मिळेल. तसेच, यात 120 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स असेल.
याव्यतिरिक्त महत्त्वाचे म्हणजे फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यात 32MP + 32MP चे दोन सेन्सर असतील. पॉवरसाठी या फोनमध्ये बॅटरी 4,700mAh असेल, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile