Upcoming Vivo Mobile: Vivo ची प्रसिद्ध लाईनअप Vivo X90 नुकतेच जागतिक बाजरात लाँच झाली आहे. त्यानंतर आता त्याच्या पुढील पिढीबद्दल चर्चा सुरु झाली आहे. होय, आगामी Vivo X100 सिरीजबद्दल टेक विश्वात चर्चा सुरु झाली आहे. याबाबत अनेक लीक्स देखील पुढे आले आहेत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
या वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता
या Vivo X100 सिरीजमध्ये X100, X100 Pro आणि X100 Pro+ मॉडेल्सचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. ही सिरीज या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, एका टिपस्टरने दावा केला आहे की या सिरीजमधील कॅमेरा खूप भारी असेल. बघुयात डिटेल्स –
आगामी Vivo X100 सिरीजमध्ये कॅमेरावर अधिक फोकस करण्यात येणार आहे, असे म्हटले जात आहे. काही लिक्सनुसार Vivo X100 मालिकेतील पेरिस्कोप लेन्स समाविष्ट असण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार आगामी फोनमध्ये 12MP Sony IMX663 अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 64MP OmniVision OV64B टेलीफोटो लेन्ससह Sony IMX9- सिरीज 1/14x-इंच प्रायमरी सेन्सर समाविष्ट असण्याची शक्यता आहे.
आगामी फोन मॉडेल्स Dimensity 9300 चिपसेटसह येण्याची अपेक्षा आहे. दोन्ही स्मार्टफोन या वर्षी नोव्हेंबरमध्ये टेक विश्वात सादर केले जाऊ शकतात. वरील सर्व माहिती लीक्सवर आधारित आहे. कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile