Upcoming! आगामी स्वस्त Vivo फोन लवकरच भारतात होणार लाँच, पहा Leak किंमत आणि सर्व डिटेल्स
Vivo ने अलीकडेच भारतीय बाजारात Vivo V50 स्मार्टफोन लाँच केला आहे.
कंपनीचा आगामी फोन Vivo V50e असण्याची शक्यता आहे.
Vivo V50e ची लाँच टाइमलाईन, किंमत आणि इतर तपशील लीक
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच भारतीय बाजारात Vivo V50 स्मार्टफोन लाँच केला आहे. आता कंपनी या सिरीजअंतर्गत एक नवीन फोन लाँच करेल. ताज्या लीक अहवालानुसार, कंपनीचा आगामी फोन Vivo V50e असण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात आधीच लाँच झालेल्या Vivo V50 पेक्षा हा स्वस्त पर्याय असणार आहे. एवढेच नाही तर, ताज्या लीक झालेल्या रिपोर्टमध्ये Vivo V50e फोनशी संबंधित अनेक तपशील समोर आले आहेत. लीक झालेल्या अहवालानुसार फोनची लाँचिंग टाइमलाइन, किंमत आणि स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे.
SurveyAlso Read: तुमच्या बायकोच्या हातात शोभून दिसेल, 50MP सेल्फी कॅमेरासह येणारा Vivo फोन, Best ऑफर्स उपलब्ध
Vivo V50e चे अपेक्षित लाँच टाइम
प्रसिद्ध टिपस्टर Yogesh Brar ने आपल्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हॅन्डलवर Vivo V50e शी संबंधित लीक उघड केले आहेत. या लीकनुसार, हा फोन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. मात्र, यामध्ये फोनच्या लाँचची नेमकी तारीख जाहीर करण्यात आली नाही. महत्त्वाचे लक्षात घ्या की, फोनच्या लाँच संबंधित कोणतीही माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

याव्यतिरिक्त, Vivo V50e ची किंमत ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त आहे. लीकनुसार, हा फोन भारतात 25,000 ते 30,000 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच, या रिपोर्टनुसार हा फोन सॅफायर ब्लू आणि पर्ल व्हाइट या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाऊ शकतो.
Vivo V50e चे अपेक्षित तपशील
लीकनुसार, आगामी Vivo V50e फोनमध्ये 6.77-इंच लांबीचा 1.5K क्वाड-कर्व्ह AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. स्मूथ परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर मिळू शकतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी, Vivo V50e फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये तुम्हाला 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 5600mAh असेल, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile