Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार बजेटमध्ये जबरदस्त फोन्स, पहा यादी
या आठवड्यात भारतात 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान भारतात एक दोन नव्हे तर, अर्धा डझन स्मार्टफोन लाँच होणार
तुम्हाला लो बजेट आणि मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन्स या आठवड्यात मिळतील.
लावा, विवो, रियलमी इ. ब्रँड्सचे स्मार्टफोन्स यादीत समाविष्ट
Upcoming Smartphones This Week: जर तुम्हाला कमी किमतीत ब्रँडेड मोबाईल आणि लेटेस्ट फोन खरेदी करायचे असतील, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. एप्रिल महिना तुमच्यासाठी अनेक उत्तम पर्याय सादर करणार आहे. होय, या आठवड्यात 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान भारतात एक दोन नव्हे तर, अर्धा डझन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. तुम्हाला लो बजेट आणि मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन्स मिळतील. या आठवड्यात भारतात लाँच होणाऱ्या नवीन मोबाईल फोन्सची यादी पुढीलप्रमाणे-
SurveyAlso Read: AC Deals Under 30000: आता परवडणाऱ्या किमतीत 1 टनचे स्प्लिट एसी खरेदी करा! पहा बेस्ट डील्स
LAVA Bold 5G
LAVA इंटरनॅशनल उद्या म्हणजेच 8 एप्रिल रोजी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा एक स्वस्त 5G फोन असेल, जो 10,499 रुपयांना खरेदी करता येईल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा मोबाईल मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरसह उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, यात 64MP AI सोनी बॅक कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा असेल. हा फोन दहा हजार रुपयांच्या किमतीत लाँच केला जाईल.

Realme NARZO 80x 5G
Realme कंपनी भारतात त्यांची नवीन Narzo सिरीज लाँच करणार आहे. स्वस्त स्मार्टफोन Narzo 80X येत्या 9 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. लीक्सनुसार, हा 5G फोन MediaTek Dimensity 6400 प्रोसेसरवर कार्य करेल. फोटोग्राफीसाठी, यात 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेसह ऑफर केला जाऊ शकतो. हा फोन 14,000 रुपयांच्या बजेटमध्ये मिळेल.
Realme NARZO 80 Pro 5G
Realme Narzo 80 Pro भारतात 9 एप्रिल रोजी लाँच होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक गेमिंग फोन असेल, VC कूलिंग सिस्टमसह येतो. कंपनीने सांगितले आहे की, या फोनवर BGMI 90fps वर प्ले करता येते. पॉवर बॅकअपसाठी, या Realme 5G फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज 6,000mAh बॅटरी आहे. Realme NARZO 80 Pro 5G फोन 20 हजार रुपयांच्या अंतर्गत लाँच केला जाऊ शकतो.

Vivo V50e
Vivo V50e हा स्मार्टफोन 10 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. हा एक मध्यम श्रेणीचा मोबाईल असेल, जो आकर्षक फोटोग्राफी मोड सह येईल. ज्याचा कॅमेरा खास असेल. लीक्सनुसार, हा मोबाईल मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, या Vivo 5G फोनच्या पुढील आणि मागील दोन्ही पॅनलवर 50MP कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग आणि 5600mAh बॅटरी असू शकते. हा फोन मध्यम श्रेणीमध्ये भारतात लाँच केला जाईल.
iQOO Z10
iQOO Z10 फोन 11 एप्रिल रोजी भारतात लाँच केला जाईल. हा फोन देखील वरील फोनप्रमाणे एक मध्यम बजेट डिव्हाइस असेल. या फोनची किंमत सुमारे 20,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे. लीकनुसार, हा मोबाईल फोन मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 8400 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. त्याबरोबरच, स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीची 1.5K OLED स्क्रीन असू शकते. फोटोग्राफीसाठी, 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 16MP चा सेल्फी सेन्सर मिळू शकतो. हा फोन 20 हजार रुपयांच्या अंतर्गत लाँच केला जाईल.
iQOO Z10x
वरील फोनप्रमाणे, iQOO Z10x 5G फोन देखील 11 एप्रिल रोजी भारतात लाँच केला जाईल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर कार्य करेल. हा या विभागातील सर्वात वेगवान मोबाइल फोन असेल, असा कंपनीचा दावा आहे. ब्रँडने असेही उघड केले आहे की Z10 प्रमाणे iQOO Z10x देखील मोठ्या आणि शक्तिशाली बॅटरीने सुसज्ज असेल. हा फोन 15 हजार रुपयांच्या श्रेणीमध्ये लाँच केला जाईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile