Upcoming Smartphones in India: ‘या’ आठवड्यात भारतीय बाजरात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी। Tech News
20 मे ते 26 मे दरम्यान भारतात अनेक जबरदस्त मोबाईल फोन लाँच केले जाणार आहेत.
Realme दीर्घ काळानंतर भारतात 'GT' सिरीज घेऊन येत आहे.
Poco F6 5G फोन भारतात 23 मे रोजी लाँच होणार आहे.
मे महिन्याचा चौथा आठवडा सुरु झाला आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप खास असणार आहे. या आठवड्यात म्हणजेच 20 मे ते 26 मे दरम्यान भारतात अनेक जबरदस्त मोबाईल फोन लाँच केले जाणार आहेत. या आठवड्यात भारतात Infinix, POCO, Vivo आणि Realme सारखे ब्रँड त्यांचे नवीन Smartphones सादर करणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात सर्व आगामी स्मार्टफोन्सची यादी-
Surveyहे सुद्धा वाचा: iQOO Z9x 5G स्मार्टफोनची पहिली सेल आज भारतात होणार सुरु, Best ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी। Tech News
Infinix GT 20 Pro

Infinix GT 20 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात 21 मे रोजी लाँच केला जाईल. Infinix GT 20 Pro 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये सादर केला जाणार आहे. हा फोन MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरच्या पॉवरने सुसज्ज असेल. या फोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी, यात 108MP OIS ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा असेल. त्याबरोबरच, यात 45W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
Vivo Y200 Pro

Vivo Y200 Pro स्मार्टफोन देखील 21 मे रोजी भारतीय बाजरात लाँच केला जाईल. विशेष स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y200 Pro 5G फोनची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेटसह येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी हा फोन Vivo Y200 Pro मध्ये 64MP OIS ड्युअल रियर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी असेल, अशी अपेक्षा आहे.
Realme GT 6T

Realme दीर्घ काळानंतर भारतात ‘GT’ सिरीज घेऊन येत आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये आहे. तर, फोनचे टॉप व्हेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लाँच केले जाऊ शकते. चांगल्या परफॉर्मन्ससाठी Realme GT 6T हा फोन Snapdragon 7+ Gen 3 चिपसेटसह भारतातील पहिला फोन असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आणि 50MP Sony IMX882 ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो. त्याबरोबरच, यात 100W फास्ट चार्जिंगसह 5,500 mAh बॅटरी असण्याचीही अपेक्षा केली जात आहे.
POCO F6 5G

Poco F6 5G फोन भारतात 23 मे रोजी लाँच होणार आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्मार्टफोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon 8s Gen 3 सह सादर केला जाऊ शकतो. स्टोरेजसाठी यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. हा फोन 90W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह येईल. तर, फोटोग्राफीसाठी यात 20MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP IMX882 OIS रियर सेन्सर मिळेल. फोनचे कन्फर्म स्पेक्स फोन लाँच झाल्यावरच समजतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile
