Upcoming Smartphones This Week: बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स ‘या’ आठवड्यात लाँच होण्याची शक्यता, Powerful फीचर्ससह सुसज्ज। Tech News
मे महिन्याचा पहिला आठवडा VIVO फोन्सच्या नावावर होता.
या आठवड्यात Samsung, Infinix, आणि iQOO चे फोन भारतात लाँच होण्याची शक्यता
Samsung Galaxy F55 स्मार्टफोनचे पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह
मे महिना सुरु होताच पहिल्या आठवड्यात VIVO फोन्सने आपली जादू पसरवली आहे. तर, या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील आपण बहुप्रतिक्षित आणि आकर्षक Smartphones लाँचची अपेक्षा करू शकतो. या आठवड्यात Samsung, Infinix, आणि iQOO सारखे ब्रँड त्यांचे मोबाईल फोन भारतीय बाजारपेठेत लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, लक्षात घ्या की अजून कोणत्याही ब्रॅंडने या आठवड्यात फोनच्या लाँच तारखेची घोषणा केलेली नाही. म्हणजेच आगामी फोनच्या लाँच तारीख अजूनही पडद्याआड आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात यादी-
SurveySamsung Galaxy F55

आगामी Samsung Galaxy F55 स्मार्टफोनचे पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह झाले आहे. मात्र, सध्या या स्मार्टफोनची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यात 120Hz रिफ्रेश दर, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरासह 6.7 इंचाचा सुपर AMOLED प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी 45Wh 5,000 mAh बॅटरी प्रदान करणे अपेक्षित आहे. ताज्या लीकनुसार, हा स्मार्टफोन या आठवड्यात 26,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच होऊ शकतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चिपसेट असेल.
Infinix GT 20 Pro

Infinix GT 20 Pro लवकरच भारतात लाँच होणार, असे कंपनीने जाहीर केले आहे. या फोनला सतत टीज केले जात आहे. या फोनची देखील लाँच डेट सध्या पडद्याआड आहे. पण, येत्या आठवड्यात हा मोबाईल भारतात लाँच होईल, अशी अपेक्षा आहे. या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले, 45W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर आणि 12GB RAM मिळेल.
iQOO Z9x

iQOO च्या Z9 स्मार्टफोनला भारतीय ग्राहकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. यानंतर, आता iQOO Z9X देखील भारतीय लाँचसाठी सज्ज झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन आधीच चीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि या आठवड्यात भारतीय बाजारातही दाखल होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की iQOO Z9x Qualcomm 6 Gen 1 चिपसेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी यात 50 MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये मजबूत 6,000mAh ची बॅटरी मिळेल, जी 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile