Upcoming Smartphone This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन, Realme, Motorola चे फोन्स यादीत सामील। Tech News

Upcoming Smartphone This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन, Realme, Motorola चे फोन्स यादीत सामील। Tech News
HIGHLIGHTS

Realme P1 5G ही कंपनीची अगदी नवीन Powerful सिरीज आहे.

Realme P1 Pro 5G फोनमध्ये रेनवॉटर टचची सुविधा असेल.

Motorola G64 5G स्मार्टफोन उद्या मंगळवारी 16 एप्रिल 2024 रोजी भारतात लाँच होईल.

आज 15 एप्रिलपासून या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात Realme, Vivo आणि Motorola कंपन्या त्यांचे अनेक नवीन Smartphone भारतात लाँच करणार आहेत. हा महिना सुरु झाल्यापासून अनेक प्रसिद्ध स्मार्टफोन कंपन्यांनी आपले जबरदस्त स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच केले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या आठवड्यात भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-

Realme P1 5G

Realme P1 5G ही कंपनीची अगदी नवीन Powerful सिरीज आहे. या सिरीजमधील स्मार्टफोनची लाँच डेट अलीकडेच निश्चित झाली आहे. Realme P1 5G फोन भारतात 15 एप्रिल म्हणजेच आज लाँच होणार आहे. कंपनी हा फोन 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करणार आहे. Realme P1 5G फोनचा लुक आणि फीचर्स फ्लिपकार्टच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्यानुसार, हा फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज असेल. तसेच, यात 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

Realme P-Series smartphone
Realme P1 5G

Realme P1 Pro 5G

वरील फोनप्रमाणेच, Realme च्या नव्या सिरीजमध्ये P1 Pro 5G फोन देखील भारतात 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. हा फोन देखील Flipkart वरून देखील खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची किंमत 20000 रुपयांपेक्षा कमी असेल. फ्लिपकार्ट लिस्टींगनुसार Realme P1 Pro 5G फोन Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. एवढेच नाही तर, या फोनमध्ये रेनवॉटर टचचीही सुविधा असेल.

Motorola G64 5G

Motorola G64 5G स्मार्टफोन उद्या मंगळवारी 16 एप्रिल 2024 रोजी भारतात लाँच होईल. अलीकडेच कंपनीने या फोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह झाली आहे. फ्लिपकार्ट लिस्टींगनुसार, Motorola G64 5G फोन MediaTek Dimensity 7025 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP बॅक आणि 16MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी दिली जाईल, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.

vivo t3x 5g

Vivo T3x 5G

Vivo T3x 5G स्मार्टफोन भारतात बुधवारी 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. हा फोन देखील Flipkart वरून खरेदी करता येईल. फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल. फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह करण्यात आली आहे. लिस्टिंगनुसार, हा फोन Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo